पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोष्ट आहे. यासाठी लेखनाचा, वाचनाचा खरा सराव वाढविला पाहिजे. शासनमान्य मराठी शुद्धलेखन महामंडळाच्या नियमां- नुसार मुद्रित पुस्तकातील हस्व-दीर्घ, अनुस्वार, विराम इत्यादींचे अनुकरण करून वाचन, लेखन केल्यास शुद्धलेखनाची वेगळी तयारी करावी लागत नाही. शिवाय किरकोळ सुद्धा का असेना, पण शंका आली की लागलीच शब्दकोशांतून वा जाणकारांकडून शंका निरसन करून घेण्याची सवय लावल्यास सततच्या निदि- ध्यासाने शुद्धलेखन कला साध्य होईल. मराठी शुद्धलेखनावर प्रसंगोपात्त व अनेक प्रकारे लेखन झालेले आहे. या लेखनामागे लेखनशुद्धीची व लेखनाच्या विकासाचीच भूमिका आहे. मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेली अधिकृत शुद्धलेखनाची नियमावली हा या अभ्यासाचा पाया आहे. शुद्ध- लेखनविषयक वादविवादाचा, मते आणि मतभेदांचा येथे विचार करण्याची सुतराम आवश्यकता नाही. मराठी शुद्धलेखनाचा विचार अंतर्भूत असलेल्या पुस्तकांची काही नावे शेवटी • अभ्यासाच्या सामग्री' त दिलेली आहेतच. १ २३