पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२) पुढे काही अशुद्ध उतारे देऊन ते मराठी शुद्धलेखन महा- मंडळाच्या नियमांप्रमाणे शुद्ध स्वरूपात लिहून दाखविले आहेत. अ) अशुद्ध उतारा : १ वारकरि पथ हा महाराष्ट्रातिल एक अत्यंत लोकप्रीय पथ आजहि आहे. आणी पुर्वीही होता. अपार भक्ति आणि उत्कट प्रिति या पंथात आपल्या साध्या, सरळ तत्वज्ञान आणी आचाराने सांगीतलेली आहे. विठलाची भक्ति, नाम भजनाचे महात्म्य भुत- मात्रातच भगवंताचे अधीष्ठान मानून त्यांच्यावरिल प्रेम 'नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदिप लावू जगी. हि प्रतीज्ञा लौकीक प्रतीष्ठा जातीभेद विसरून अध्यात्मिक पातळीवरील लोकशांहि एकात्मता हि या वारकरी पंथाची खास वैशीष्ट्ये आहे. अ) शुद्धं उतारा : १ वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय पंथ आजही आहे, आणि पूर्वीही होता. अपार भक्ती आणि उत्कट प्रीती या पंथात आपल्या साध्या सरळ तत्त्वज्ञान आणि आचाराने सांगितलेली आहे. विठ्ठलाबद्दलची भक्ती, नामभजनाचे माहात्म्य भूतमात्रातच भगवंताचे अधिष्ठान मानून त्यांच्यावरील प्रेम नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी । ' ही प्रतिज्ञा, लौकिक- प्रतिष्ठा, जातिभेद विसरून आध्यात्मिक पातळीवरील लोकशाही एकात्मता ही या वारकरी पंथाची खास वैशिष्ट्ये आहेत. २६ J