पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उलट-सुलट, अनुकूल-प्रतिकूल बाजू असतात. दोन्ही बाजूंनी वादपटू बोलतात आणि शेवटी अध्यक्षीय समारोप होतो. तेव्हा सहभागी झालेल्या १०-१२ वक्त्यांच्या आशयातील मुख्य सूत्र पकडणे अवघड कसोटी आहे. सरावाने ती जमते. ५) वृत्तपत्रांमध्ये वाचकांचे मनोगत, गाऱ्हाणे, तक्रारी, सूचना, उलट- सुलट चर्चा, प्रतिक्रिया छापण्याची सोय असते. 'बहुतांची अंतरे', 'लोकमानस', 'वाचकांचे मनोगत ' ' वाचकांच्या प्रतिक्रिया' 'माझेही मत', 'स.न.वि.वि.' अशा अनेक शीर्षकाखाली ही सदरे कमालीची लोकप्रिय झाली आहेत. त्यात पुष्कळदा मान्यवर लेखकांची पत्रेही प्रसिद्ध होत असतात. त्यामध्ये उदाहरणादाखल पुढील नामवंतांची नावे आढळतात. प्रभाकर पाध्ये, अ. भि. शहा, दुर्गा भागवत, अ. वा. वर्टी, रणजित बुधकर इत्यादी. शासन, संप, शिक्षण, कृषी, विज्ञान, राजनीती, कला, भाषा इ. संदर्भातील विविध प्रश्नांवर विविध तन्हांनी जाहीरपणे उपरोक्त सदरांतून चर्चा घडून येतात. अशा चर्चाचे वृत्तांत - संकलन करणे आणि त्यातील एकूण सूत्र, सांगोपांग चर्चा, संक्षेपाने ग्रथित करणे हाही वृत्तांत - लेखनाचाच भाग आहे. ६) घटना-प्रसंग - अपघात वृत्तांत उदाहरणार्थ, रिक्षा आणि बस यांची जोरदार टक्कर झाली असताना वार्ताहराला त्या घटनेचे वृत्तांत - लेखन तत्परतेने करून द्यावे लागते. या लेखनाला संपादकाच्या दृष्टीने फार महत्त्व असते. वार्ताहराकडून तातडीने सर्व धागेदोरे फोटोंसह, कायदा सांभाळून, वृत्तांत - लेखन त्याला हवे असते. घडलेल्या घटनेच्या बाबतीत विभिन्न मते आणि दृष्टिकोन असू शकतात. घ ३८