पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोळीबार, अश्रुधूर, सभेतील गोंधळ, घात - अपघात, चोरी, दरोडे इ. संदर्भातील प्रकरणांची माहिती येत असते. एक वस्तुपाठ उदाहरण म्हणून त्यांचा अभ्यास करावा. ८) वृत्तांत - लेखकाने निःपक्षपातीपणाने जातीने हजर राहून अनुभवलेल्या गोष्टींच्या आधारे वृत्तांत - लेखन करणे. अधिक श्रेयस्कर असते. निदान विश्वसनीय जबाबदार व्यक्तींच्या- कडून ही माहिती मिळवलेली असली पाहिजे. वृत्तांतात उल्लेखिलेल्या व्यक्तीच्या मुखातील प्रत्यक्ष उद्गार दिल्याने वृत्तांत लेखन अधिक प्रभावी बनते. त्यात सुसंवादीपणा, जिवंतपणा, अधिकृतता अधिक येण्याची शक्यता बळावते. ९) माहीत असलेला अधिकृत परंतु अचूक, निर्दोष तपशील वृत्तति - लेखकाने पुरविला पाहिजे. तेवढ्यासाठी वृत्तांताची जास्तीत जास्त माहिती करून घेणे आवश्यक आहे. १०) वृत्तांताविषयी वृत्तांत लेखकाच्या मनात कोणत्याही प्रकारचा गोंधळ असणे उचित ठरत नाही. ११) वृत्तांत - लेखन हे प्रामुख्याने वाचकांसाठीच लिहावयाचे आहे याचे सतत भान ठेवून लेखकाने मजकुरात सुटसुटीतपणा आणावा. वृत्तांतावर स्वतः लेखकाचा नीट संस्कार व्हावा. आवश्यक त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन बाळगावा. १२) वृत्तांतातून वाचकांना ज्ञान देता देताच त्याची करमणूकही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मित्रत्वाच्या भूमिकेतून लेखकाने वाचकाला माहिती द्यावी, मार्गदर्शन करावे आणि स्वमत प्रतिपादन करावे. 海鮮