पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरंभीचे निवेदन महाराष्ट्रात जानेवारी, १९८५ पासून सर्वत्र मराठीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे. प्रत्यक्ष अनुभव असा की, मराठी शुद्धलेखनाबद्दल खात्री नसल्याने व " मागील पानावरून पुढे चालू" यासाठी जुन्या फायली तयार नसल्याने, मराठीकरणाची प्रक्रिया पाहिजे तसा जोर धरीत नाही. मराठी भाषिक, मराठी विषयाचा विद्यार्थीवर्ग, मुद्रक, मुद्रणशोधक या सर्वांनाच निदान काही शब्दांच्या शुद्ध लेखना- बद्दल संभ्रम पडतोच ! तो तपासून पाहण्यासाठी हाताशी साधनसामुग्री तात्काळ उपलब्ध होत नाही. चर्चा करून शुद्ध लेखनातील चुकांची दुरुस्ती करून घेणे ही स्वागतार्ह प्रवृत्ती असूनही प्रत्यक्षात फारशी अंगी बाणलेली नसते. जाणकारांच्या बाबतीतही हाच संकोच आढळून येतो. त्यामुळे वृत्तपत्रविद्या विभागाचे वा ऐच्छिक मराठी विषय घेतलेले विद्यार्थी शुद्ध शब्दलेखन या कसोटीला फारसे उतरत नाहीत. अर्थात यात आमच्या मराठीच्या शिक्षकांचाही अपवाद नाही. ए पीएच्. . डी. साठी प्रबंध लिहीत असतांना प्रा. डॉ. ह. कि. तोडमल यांनी "लेखन कच्चे असो वा पक्के असो" शुद्धच लिहिण्याचा आग्रह धरला. तर या पुस्तकाचे प्रस्तावना-लेखक डॉ. राजाभाऊ गायधनी यांनी शुद्ध लेखनातील काटेकोरपणा, अनेक शब्दांची चर्चा करून पीएच्. . डी. चा प्रबंध तपासताना शिकविला. त्यांची शुद्धलेखन शब्द नोंदवही मुक्तपणे वापरू दिली. प्रा. डॉ. स. गं. मालशे, डॉ. हे. वि. इनामदार व डॉ. चंद्रकांत वर्तक, बाळासाहेब सराफ यांनीही या पुस्तकातील विवेचन परिपूर्ण होण्यास अनेक उपयुक्त सूचना दिल्या. या सन्मार्गदर्शकांचा मी ऋणी आहे. 'मराठी अन्याय निवारण' परिषदेच्या कार्यास मित्रवर्य प्रा. सु. का. जोशी, पद्माकर मराठे, चंद्रकांत अडावदकर यांनी चालना देऊन अशा प्रकारच्या उपयुक्त लेखनाची सुप्त प्रेरणा दिली. मराठीतील सर्वच लेखन-संदर्भात काही सुलभ मार्गदर्शन व्हावे या उद्दिष्टाने वृत्तलेखन, सारलेखन, निबंधलेखन व आस्वादलेखन इत्यादी.. लेख यात समाविष्ट केले आहेत. दोन