पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या सारलेखनात संक्षेप अवतरल्यामुळे हा आपोआपच एक तृतीयांश होईल. मग त्याला अनुसरून अनुरूप व अत्यंत चंपखल, समर्पक शीर्षक शोधून द्यावे. सारलेखन शक्यतो स्वतःच्या भाषेत करावे. या पद्धतीने केलेले सारलेखन “ थिगळे " विस्कळीत रचनेचे, क्रम विकासरहित होणार नाही. या सारलेखनाच्या मार्गदर्शनाने सारलेखन कला सहज साध्य होईल याची खात्री वाटते. एखाद्या तीन पानी लेखाला एका पानात आणणे याला सारलेखन स्थूल मानाने म्हणता येईल. . सारलेखनासाठी उतारा वाचून नीट समजून घेतला पाहिजे. मगच निर्दोष, अचूक संक्षेप शक्य होईल. नेहमी लिहिताना सामान्यांच्या लेखनात एकच गोष्ट शब्द बदलून किंवा मुळातील लेखनशैली पुसून लिहिलेली आढळेल. पण आपण जेव्हा सारलेखन करतो त्यावेळी पुनरुक्ती टाळता आली पाहिजे. वाक्यातील अर्थ, 'आशय कायम राहून काही शब्द व वाक्प्रयोग वगळता येत असल्यास पाहावे. सारलेखन करताना वाक्यातील मूळ कल्पनाच फक्त विचारात घेतली पाहिजे. त्यावरच सारा भर असावा. पुढे दिलेल्या उदाहरणातून हे स्पष्ट होईल. 66 'माझ्यावर जरी अनेक दुःखद प्रसंग आले असले तरी माझा एकंदरीत जगाचा अनुभव कटू आहे. जग हे वाईट माणसांनी भरलेले आहे, असा माझा अनुभव नाही. अनेक ठिकाणचे अनुभव असे सांगतात की, दुष्टपणापेक्षा अज्ञान व गैरसमज यांनी तंटे व भांडणे उत्पन्न होतात. या उताण्याच्या काही ओळीत जवळपास पहिले २५ शब्द अनावश्यक आहेत. मुद्दा फक्त एवढाच आहे की, ' जगात दुष्ट- पणापेक्षा अज्ञान व गैरसमज यांनी तंटे व भांडणे उत्पन्न होतात '. ५०