पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ललित किंवा लघुनिबंध लिहितांना त्यात जमल्यास विनोदनिर्मिती स्वाभाविकपणे व खेळकरपणाने करावी. निबंधाचा शेवट सूचक आणि चटकदार असावा. पूर्वी विवेचन केलेल्या किंवा येऊन गेलेल्या भागाचा संक्षिप्त सारांश निबंधाच्या शेवटच्या भागात द्यावा. समारोपात आपले काही म्हणणे असल्यास सयुक्तिकपणे पटवून द्यावे लागते. वर्णनात्मक निबंधात सहली, देखावे, शब्दचित्रे, समारंभ- वर्णन, प्रेक्षणीय स्थळे इत्यादींचा समावेश होतो. उदाहरण म्हणून पुढील निबंध - विषय पहा - माझे खेडेगाव, चांदणी रात्र, इंद्रधनुष्य, सूर्योदय, सूर्यास्त, वसंतऋतू, पावसाळा, गणेशोत्सव, सभा - सम्मेलन- वृत्तांत,. श्रमदान इत्यादी. चरित्रात्मक निबंधात मोठ्या माणसांची, थोर विभूतींची - चरित्रे स्वतःच्या भाषेत लिहावी लागतात. जन्म, बालपण, विद्याभ्यास, उद्योग, कार्य, त्यांच्या जीवनकार्याचे एकूण मूल्य- मापन ह्या गोष्टी चरित्रनायकाची नीट ओळख व्हावी आणि त्या व्यक्तीबद्दलची जिज्ञासा वाचकांच्या मनात निर्माण व्हावी, असा हा निबंध लिहिला पाहिजे. व्यक्तीच्या जीवनकार्यातील ठळक घटना प्रसंगाच्या आधारे परिच्छेद पाडून लिहिता येते. अशा प्रकारच्या निबंधाचे उदाहरण म्हणून गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, जयप्रकाश नारायण, पु. ल. देशपांडे, आपला आवडता साहित्यिक किंवा नेता या विषयांचा उल्लेख करता येईल. E ५७: