पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वैचारिक निबंधात विषयानुरूप प्रस्तावना केली पाहिजे. साधकबाधक प्रमाणांसह विवेचन केले पाहिजे. शेवटी वैचारिक विषयाचे सार काढून मांडता आले पाहिजे. या निबंधाची भाषाशैली तर्कशुद्ध व गंभीर अपेक्षित आहे. आजची शिक्षणपद्धती, खरा रसिक, आंतरराष्ट्रीय युवक वर्ष, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. यासारखे निबंधाविषय वैचारिक निबंधात मोडतात. लघुनिबंधाला मात्र कोणत्याही विषयाचे वावडे वा बंधन नसते. त्या विषयाच्या निमित्ताने आपण खेळकरपणे, मिस्किल विनोद- बुद्धी जागृत ठेवून वाचकांना विश्वासात घेऊन, मुक्त मनाने, मात्र आटोपशीर लिहावयाचे असते. नको तो प्रवास, - आमचे शेजारी, घड्याळे बंद पडली तर - निबंधाचे असतात. नको त्या परीक्षा, असे विषय लघु- ५८