पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जलवाहिनि निश्चल कृष्ण बन झुकले काठी राधा - विप्रश्न युगानुयुगची चिर- तंद्रा, - पु. शि. रेगे त्रिधा राधा : रसग्रहण

सुहृद गाथा या पु. शि. रेग्यांच्या काव्यसंग्रहातील कविता चाळताना माझं मन खेचून घेतलं हे ' त्रिधा राधा' ह्या कवितेच्या ' त्रिधा' ह्या शब्दाने ! नाविन्यपूर्ण शब्दांची काव्यात उधळण करणारे अन् तरीही मोजक्या शब्दांत हवा तो आशय व्यक्त करणारे, म्हणून रेग्यांची ख्याती आहेच. पण प्रत्यय आला तो काव्यसंग्रह हाती आल्यानंतरच ! खरं पाहिलं तर राधा कृष्णाच्या प्रेमाचा विषय हाच मुळात वेळोवेळी चर्चिला गेलेला आणि जुना झालेला साधाच विषय. त्यातून उण्यापुऱ्या १० - १२ ओळींच्या काव्यात नवीन ते काय सांगणार ? रेग्यांचे काव्यसौष्ठव नजरेत भरते ते अशाच ठिकाणी. पारंपरिक शब्दांत प्रकट करता न येणारा आपला अमूर्त आशय ते वैशिष्ट्यपूर्ण शब्दांनी व्यक्त करतात आणि तसं करताना नकळत आपल्या काव्यशैलीची छाप पाडून जातात. 9 " त्रिधा राधा ह्या कवितेत राधा - कृष्णांच्या आदिम प्रतिमांना निसर्ग प्रतिमांचे रूप देऊन शीर्षकात सुचविल्याप्रमाणे राधेची तीन रूपे दाखवली आहेत. निसर्ग प्रतिमांना स्वतःचे रंग, रूप, आकार, स्थिती, गली इ. अंगभूत गुणधर्म लाभलेले असतात. ६५