पान:मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डोलते. कृष्णाच्या अंगस्पर्शातून त्याचे प्रेम तिला जाणवल्यामुळेच तिचे प्रेम शिगेला पोचले आहे की जणू त्यांचे युगानुयुगांचे नाते आहे. पण असे असूनही कृष्णाचे प्रेम अजून अव्यक्तच आहे. ते व्यक्त झाल्याशिवाय त्याची निश्चिती राधेला वाटत नाही तिच्या मनात प्रश्नांचे कल्लोळ उभे राहिले आहेत. त्याच्या मनात आपल्याशिवाय कुणाला स्थान आहे का हे शल्य तिला जाणवतंय पण भेटीसाठी आतुर झालेली बनरुपी राधा जलवाहिनीरूपी कृष्णाच्या अंतरंगात जेव्हा डोकावून पाहले अन् त्यावेळी कृष्णाच्या हृदयात केवळ स्वतःचीच प्रतिमा पाहते तेव्हा तिच्या मनाला असीम आनंद होतो. क्षणार्धात तिच्या मनातले प्रश्न विप्रश्न होतात. अन् भरल्या मनाने ती स्वतःला एक प्रकारच्या तंद्रीत हरवून बसते. प्रेमाच्या सफलतेतून निर्माण होणारी चिरतंद्रा ती हीच. युगानु- युगांपासून असेच घडत आलेलं आहे व पुढेही असेच घडत राहणार आहे. ' त्रिधा राधा' च्या तीन शब्द शिल्पांतून रेग्यांनी घडवलेली राधेची तीन प्रतिमा -युग्मे प्रथमदर्शनी जरी अलग, विलग दिसत असली तरीही त्यामधून प्रेमभावाचे एक विकसनशील प्रवाही व सलग रूप व्यक्त झालेले आहे. राधेच्या मनोवृत्तीत होत जाणारा बदल हा स्त्री वृत्तीचा द्योतक आहे. कारण सुरुवातीला बावरलेली राधा ही नंतर स्वच्छंद मनाने डोलते आणि नंतर प्रेमाची परिणती सफल प्रेमात झाल्यामुळे विप्रश्न झालेली राधा स्वतःला चिरतंद्रीत हरवून बसते. रेग्यांच्या कवितेचे स्वरे वैशिष्ट्य स्त्रीचे नाजूक विभ्रम, नाजूक मुलायम काव्यपंक्तीतून अभिव्यक्त करण्यातच साठलेले [ ६७