पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३) महीपतिः-19 ओव्या. कान चिन्छ 1, अभ्यास केला जन्मवर । समयीं नाठवे प्रत्युत्तर । विकल्प चित्तीं उठती फार । : तरी ईश्वरक्षोभ जाणावा ॥ १३ ॥ वैरियां सांपडे आपलें वर्म । त्यांसारिखेंच बोलती जन । चित्तीं संताप ये क्षणक्षण । तरी ईश्वरक्षोभ जाणावा ॥ १४ ॥ अन्नावांचून कुटुंबवत्सल । प्रवासी करी तळमळ । घरी दाता करी हळहळ । तरी ईश्वरी क्षोभ जाणावा ॥ १५ ॥ वृद्धपणीं गात्रे विकळ । पुत्र न घेती समाचार सकळ । कांता करीतसे तळमळ । तरी ईश्वरी क्षोभ जाणावा ॥ १६॥ बाळपणीं मरतां माता । तरुणपणी निजकांता । वृद्धपणीं शोक होतां । ईश्वरी क्षोभ या नांव ॥ १७ ॥ TEE Narine | समभक्तविजय. FREE६. तीथेवास. REA मुक्तेश्वरः- ओव्या. तीर्थी न वसतां तीर्थवास । सत्यवंत नित्य निर्दोष । तीर्थी वसतां पुण्यलेश । तीर्थे एका नेदिती ॥१॥ मत्सर नैष्ठर्य भूतद्वेष । भजनमार्गीचा उपहास । तीर्थे त्याचा घेती त्रास । कीटक देशी त्या वसती ॥ २॥ इंद्रियनियमाचा । व्यसनी । सत्य मधुर असे वाणी । अहंकार ज्याचिया मनीं । संचरेना सर्वथा ॥३॥ तो सकलतीर्थाचा धात्रा । तीर्थे करिती त्याची यात्रा । पादोदकालागी पवित्रा। तीर्थे माथां वोढविती ॥ ४ ॥ तीर्थी असोनि इच्छारहित । प्रतिग्रहा न घाली हात । यथाला. संतोषभरित । तो तीर्थरूप जाणावा ॥ ५॥ परधनी अंधत्व ज्याचिया नयनां । परस्त्री पाहतां क्लीबत्व मना । परापवादी मूकत्व वदना । तो जनक जाण तीर्थाचा ॥६॥ मनइंद्रियनिग्रहकारी । तो गृही असोनि जान्हवी। तीरीं । तीर्थी असोनि अनाचारी । तो कीटकवासी जाणावा ॥ ७ ॥ सत्यशील 1 दृढवृत्ती । आत्मभावना सर्वभूतीं । क्रोध कधी का नाढळे शांति । तो तीर्थी । सर्वी सेविजे ॥ ८॥ सुबुद्धशील विद्यातीर्थी । साधु सुस्नात सत्यतीर्थी ।