पान:मराठी भाषेचे वाक्प्रचार, म्हणी, इत्यादि.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्रकाशकाचे दोन शब्द.

 म्याट्रिक्युलेशन, स्कूल फायनल, व इतर परीक्षांचे विद्यार्थी, यांना मराठी भाषा हा विषय तयार करावा लागतो, व त्यांना संप्रदाय, म्हणी, वगैरेंसंबंधानें प्रश्न विचारण्यांत येतात. म्हणून या परीक्षांस जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीं आम्हीं मराठी संप्रदाय, म्हणी, वगैरेंचा संग्रह तयार करण्याविषयीं रा. रा. विद्याधर वामन भिडे यांना विनंती केली, ती त्यांनी मान्य करून हे पुस्तक रचिले आहे. "मराठी म्हणींविषयीं चार शब्द," व "मराठी शब्दांचे उद्घाटन" वगैरे पुस्तकांवरून रा. रा. भिडे यांचे मराठी भाषेविषयींचें प्रेम व विचार व्यक्त करण्याची शब्दरूपी व वाक्यरूपी जीं साधनें, त्यांचे अध्ययनहीं महाराष्ट्रीयांच्या प्रत्ययास आलेलीच आहेत. त्यावरून रा. रा. भिडे यांचें हें पुस्तक कितपत प्रमाणभूत होईल याची अटकळ सहज होण्याजोगी आहे.
 ह्या पुस्तकाची सर्व तें रा. रा. भिडे यांच्या नजरेखालून गेलेलीं आहेत. आतां हें पुस्तक ज्यांच्या उपयोगासाठी आम्ही तयार करविलें आहे, त्यांना तें खरोखरीं उपयोगी झालेले असल्यास आमच्या व ग्रंथकर्त्यांच्या मेहेनतीचें सार्थक झालें, असें आम्ही समजूं. पैका टायपाच्या सुमारें पांचशे पानांच्या पुस्तकाला दीड रुपया किंमत आम्हीं ठेविली आहे, ती प्राहकांना जड वाटणार नाहीं, अशी आमची उमेद आहे.

चित्रशाळा, पुणे. 
 प्रकाशक.
ता० २५ आक्टोबर १९१०.