पान:मराठी रंगभुमी.djvu/२३७

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०३
भाग ३ रा.


गाणारें पात्र अडखळून अडखळूनच गाऊ लागले.यायोगानें गाण्याचाही विरस झाला आणि पत्र काय होतें तेंही लोकांना समजले नाही. असा प्रकार असू नये असे आमचे मत आहे.
 (७) पुष्कळ नाटककंपन्यांत गाण्यापेक्षां पेटीचाच आवाज मोठ्यानं ऐकू येत असतो, त्यामुळे पात्र कोणतें पद्य गात असतें तेंसुद्धां समजत नाही. दुसरे असे की, पात्राच्या गाण्याबरोबर पेटीवाल्याने पेटीतून ते पद्य वाजवू नये. दोन्ही प्रकार एकदम सुरू केल्याने गाणार्या पात्राचा कमीपणा पुष्कळ झांकत असेल, पण त्या योगाने गाण्याची सुमारी नाहशी होते व चांगले पात्र असेल तर जी खुमारी लोकांच्या नजरेस यावयाची तिचा तरी लोप होतो. यापेक्षां पात्राचा अभिनय चालला असताना मध्ये वेळ सांपडल्यास पटवाल्याने आपली करामत दाखवावी. वास्तविकपणे पेटीचा नुसता सूर धरूनच पात्राने गायलें पाहिजे व यालाच खरें गायन म्हणावे. नाहीतर पेटीच्या सुरांत कसाबसा तरी आपला स्वर मिळवून टाकून मोकळे होण्यांत काय तात्पर्य आहे? पूर्वी पूर्वी किर्लोस्कर वगैरे मंडळींत ही वहिवाट होती व त्यायोगानें पात्रेही चांगली तयार होऊन लोकांचे मनोरंजन करू लागली. हल्ली पानांच्या दसपट काम पेटीवालेच करुं लागल्यामुळे व नाटकवा ल्यांना अशा प्रकारची परावलंबनाची संवय लागल्यामुळे