पान:मराठी रंगभुमी.djvu/२४४

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१०
मराठी रंगभूमि.

तांतील एक प्रकारची भीड मोडून जवळ जाण्यापासून अगर अंगस्पर्शापासून उत्पन्न होणाऱ्या मनोवृत्ती किंचित् बोथट झालेल्या असतात. आमच्या इकडे असा प्रकार नाहीं. समाजांत स्त्रीपुरुषांचे संघट्टण क्वचित् होत असल्यामुळें व लज्जा, विनय, दूर दूर राहणें, इत्यादि गोष्टींचा स्त्रियांच्या सौंदर्यात समावेश होत असून त्या गोटी उद्दीपक असल्यामुळें स्त्रियांचा सहवास जात्याच मनुष्याच्या वृत्तींत फरक उत्पन्न करितो. अर्थात् स्त्री-पुरुषांच्या एकत्र सहवासापासून सुपरिणाम होण्यापेक्षां कुपरिणाम होण्याचा जास्त संभव आहे. अशा स्थितींत नाटकांत स्त्रिया घेऊन त्यांच्यासह पुरुषांनीं अभिनय करणें अहितकारक असून त्याने कंपनीचं वर्तनही बिघडतें. खेरीज नाटकप्रयोगाच्या वेळींही मनोवृत्तींत चलबिचल होऊन पात्रांच्या हातून योग्य रीतीनें कामें नाहींत. आम्हांस एका स्त्रीमिश्र नाटकमंडळीची एकानें अशी गोष्ट सांगितलेली आठवते कीं, एका स्त्रीनें राधेचें सोंग घेतले होते, व पुरुषानें कृष्णाचे सोंग घेतलें होतें. प्रवेश श्रृंगारपर असून त्याची आंत सर्व तयारी झाली. आतां पडदा उघडणार इतक्यांत त्या दोघांही स्त्रीपुरुषांच्या मनांत कामविकार उत्पन्न होऊन त्यांच्या अशा प्रकारच्या चेष्टा सुरू झाल्या कीं, पडदा उघडणारास तो उघडण्याची पंचाईत पडली. पुढें उशीरा बद्दल बाहेर जेव्हां टाळ्या वाजूं लागल्या व आंतील मंडळीनें