पान:मराठी रंगभुमी.djvu/२४५

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२११
भाग ३ रा.

जेव्हां छीथू केली तेव्हां दोघांच्या वृत्ती ताळ्यावर येऊन नाटकास सुरवात झाली. तात्पर्य, नैतिक दृष्टीने आमच्या इकडे नाटकांत स्त्रिया असण्यापासून अनिष्टच परिणाम होणार आहे. पुणे येथील सार्वजनिक सभेच्या इंग्रजी त्रैमासिकांत Our amusements या निबंधांत बाब डी. एन्. गांगोली यांनीं वरीलप्रमाणेच नाटकासारख्या कर मणुकींतून स्त्रीपुरुषांच्या सहवासाचा निषेध केला आहे. ते म्हणतातः
 " Female actresses have been introduced into some of the theatres. The mixture of males with females in such pleasure parties is not at all desirable; and although it is true that females can act the parts of women better than males the separation of males from females on such occasion is necessary in order to improve the tone of morality in the members of the theatrical parties. "
 बरें, कलेच्या दृष्टीने पाहिले तरी स्त्रियांनीं स्त्रियांचीं कामे करण्यात महत्व आहे असें नाहीं. पुरुषांना स्त्रवेष घेऊन व हुबेहुब स्त्रियांप्रमाणे भाषण, अभिनयादि करून दाखविण्यांत जी कला आहे ती स्त्रियांनीं स्त्रियांची कामें करण्यांत नाही; व म्हणून पुष्कळ वेळां स्वाभाविक गोष्टींपेक्षां कृत्रिम गोष्टींने जे सौंदर्य यावयाचें तें न येऊन विरस झाल्याचेही आढळून येते. उलट पक्षीं स्त्रियांनीं प्रसंगविशेषीं पुरुषाचे काम करून दाखवण्यांत कौशल्य आहे; व पुणेकर हिंदुस्त्रीनाटकमंडळींत विठाबाई म्हणून