पान:मराठी रंगभुमी.djvu/२४७

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१३
भाग ३ रा.


मनें श्रृंगार रसाकडे वळविलींच ! बरें, हा श्रृंगारही उच्च प्रतीचा नसून अगदीं बीभत्स असतो. त्यामुळे तमाशांत व यांत फारसें अंतर नसतें असें म्ह्टल्यास वावगे होईल, असें आह्मांस वाटत नाही. यांतील बरीच स्त्रीपात्रें अलीकडे अशीं कांहीं नटूं लागली आहेत कीं, त्यांत सभ्यपणास कोठेही थारा नसून त्यांचा उलट केसाचा बुचडा, बारिक कुंकवाची टिकली, चुण्या पाडलेले घोळ दार व पट्टी काढून नेसलेले लुगडें, चंचल दृष्टीने पाहणे, व सतरा ठिकाणीं मुरकों ही केवळ वारांगनेस शोभण्यासारखी असून त्यांची भाषणे व हावभाव करण्या चीही तऱ्हा तशाच प्रकारची असते. त्यामुळे नाटकांत दुसरा कोणताही रस असला तरी दरघडीस हीं पात्रे त्याचा विसर पाडून श्रृंगाररसाचेंच पोषण करीत अस- तात. पूर्वीच्या मृच्छकटिक नाटकांत नायिका प्रत्यक्ष एक गाणका आहे,तरी तिची कोणतीही कृति उत्तान शृंगारास पोषक नाही; एवढेच नव्हे तर तिच्या हर एक श्रृंगारविषयक कृतींत निष्कपट प्रेम, सरळ स्वभाव, गुणग्राहकता हीं दिसून येऊन त्यांचाच पगडा प्रेक्षकांच्या मनावर जास्त उमटतो. याचे प्रत्यंतर नाट्यानंद किंवा किर्लोस्कर कंप नीचा हा खेळ ज्यांनी पाहिला असेल त्याला सहज पटेल. हल्लीं गणिकेची तर गोष्टच राहो, पण कसलीही सभ्य स्त्री असली तरी नवीन तऱ्हेंच्या पद्यांनीं, झगड्यांनीं, किंवा हावभावांनीं तिला अशी तयार केलेली असते कीं,