शोक किंवा करुणरसाचे वेळीं सुद्धां उत्तान शृंगारासच
उत्तेजन मिळावें. अशा प्रकारच्या नाटकांनी लोकांची
अभिरुचि बिघडल्यामुळे इतर रसांचा आस्वाद घेणाऱ्या
त्यांच्या मानसिक शक्ति क्षीण होत चालल्या आहेत, व
त्यामुळे त्यांनाही रोज अशा प्रकारची नवीं नवीं नाटकें
लागू लागलीं आहेत; व कोणी नवी टूम काढून या
शृंगारास अधिक खुलविलें असल्याचें त्यांच्या कानावर
आलें कीं, त्याचे सेवन करण्यास ते मोठ्या उत्सुकतेनें
तयार होऊन बसतात ! या शृंगारांत जणूं काय अद्याप
अनेक उणीवाच आहेत म्हणून कित्येक नाटकवाले स्त्रि
यांचे ताफे बाळगून त्यांच्या स्वैर अभिनयाने त्या भरून
काढू लागल्या आहेत; व एका कंपनीने तर याहीवर
ताण करून बीभत्सशृंगाराचा कळस बांधला आहे ! हो
मंडळी झणजे ‘ महाराष्ट्रहितेच्छ नाशिककर ' ही होय.
या मंडळीसंबंधानें उमरावती येथील ‘ प्रमोदसिंधू '
पत्राच्या ता. ७|८|०३ च्या अंकांत पुढील अर्थाचा
उल्लेख आहे:-
" ही मंडळी प्रथम गद्यात्मक नाटकें करीं, प्राप्ति बरी
होई. पुढें कांहीं कारणाने या मंडळीनी संगीताकडे धांव घेतला;
पण उत्पन्न होईना म्हणून कांहीं खटपट करून थकून शेवटी हिनें
एक नवीनच टूम काढली ! ती रामराज्यवियोगाच्या हस्तपत्रका
वर 'प्रयोगानंतर, नवीन आणलेल्या गोंवेकरणीच्या बैठकीच्या
गाण्याचा जलसा होईल असे लिहून त्याप्रमाणें नाटक आटोप
ल्यावर तेथें बैठक करून तबकांत पैसे टाकले ही होय ! असली
टूम कुलस्त्रिया व तरुण विद्यार्थी यांनी पाहणे अयोग्य होय.
पान:मराठी रंगभुमी.djvu/२४८
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१४
मराठी रंगभूमि.