पान:मराठी रंगभुमी.djvu/२५०

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१६
मराठी रंगभूमि.


या बाबतीत लोकांना दोष देणें म्हणजे आपल्या अनुचित कृत्याचा दुसऱ्यावर सूड उगविणें होय. नाटकमंडच्या जी नाटकें करतात ती आपल्या फायद्याकरितां करतात ही गोष्ट खरी आहे. पण त्यांतल्या त्यांत त्यांनी कोणतीं नाटकें करावी व कोणती करू नये हे पाहिले पाहिजे. कारण, करमणुकीच्या द्वारें लोकसमाजास शिक्षण देण्याचे काम त्यांच्या हातीं असतें. किर्लोस्करादि पहिल्या नाटकमंडळ्यांचे पुरस्कर्ते हें कर्तव्य बऱ्याच अंशानें जाणत हाेते त्यामुळे त्यांची नाटकें सरस व बोधप्रद अशी असत. पण पुढे रा० पाटणकर यांनी हा कित्ता सोडून देऊन लोकाभिरुचीस अगदीं निराळे वळण लाविलें; व अलीकडील कित्येक कंप न्यांनी तर हे वळण गिरविण्याचा इतका सपाटा चालविला आहे की, त्यांना त्याशिवाय दुसरें कांहींच दिसत नाही. या विषयासंबंधाने लिहितांना ‘ मराठा ' कर्ते रा. केळकर यांनी एके ठिकाणी पढील विचार प्रगट केले आहेत. ते ह्मणतातः –“ नाट्याविषयांत जनरुचि अमुक एका प्रकारची ठेवणें हें काम नाटक मंडळ्यांचे हातींच आहे. या बाबतींत मागणीप्रमाणें पुरवठा होत नसून पुरवठ्याप्रमाणे मागणी होत असते. जोपयंत नाटक हैं करमणुकचं एक साधन आहे तों पर्यंत जनसमाज हा नाटकाचा बंदा आहे; व अशा स्थितींत नाटकमंडळी वळण जें लावतील तें वळण