लोकांस लागणार आहे. " तात्पर्य, लोकाभिरुचि भ्रष्ट
केल्याचे पातक जनसमाजाकडे नसून नाटकमंडळ्यांकडेच
आहे व याबद्दल त्यांसच जबाबदार धरलें पाहिजे.
हल्लींच्या प्रकारावरून ही आभरुचि लवकर सुधा
रेल असा रंग दिसत नाही. करितां सुशिक्षित
लोकांनी त्याबद्दल विशेष खटपट करणे जरूर आहे.
नाटकाची सुधारणा होण्यास आमच्यांतील विद्वान् लोकांनीं खटपट केली पाहिजे. चांगलीं नाटकं कोणतीं, वाईट नाटकें कोणती याची निवडानिवड करून चांगल्या नाटकांसच त्यांनी उत्तेजन दिलें पाहिजे; विशेषतः संगीत नाटकांसंबंधाने तर त्यांनी जास्त खबरदारी घेतली पाहिजे. कारण, प्लेटोनें ह्टल्याप्रमाणं “मर्या देचें अथवा कायद्याचे उल्लंघन कोणचेही लक्षात न येतां करमणुकीच्या रूपान प्रथमतः या संगीताचे द्वाराने होऊ लागले. अमर्यादपणा अथवा उच्छृं खलपणा यांचा या द्वारानें मनांत प्रथम शिरकाव होतो आणि मग हळू हळू रीतभान व वागणूक यांतही त्याचे परिणाम दृष्टीस पडू लागतात. " ही नाटकांवरील देखरेख विद्वानांना दोन तीन रीतीने ठेवतां येईल. एक नाटकप्रयोगांवर वर्तमानपत्रांतून योग्य चर्चा करून: व दुसरें प्रयोगांत त्यांतील गुणदोषांवर तोंड टीका करून.