पान:मराठी रंगभुमी.djvu/२५४

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२०
मराठी रंगभूमि.

अद्याप व्हावी तशी सुधारणा झालेली नाहीं.जाहिराती पुष्कळ वेळां साध्याच काढल्या जाऊन त्या मागच्या खेळाच्या आहेत कीं, पुढच्या खेळाच्या आहेत हें केव्हां केव्हां ओळखतही नाहीं. करितां जाहिराती नेहमीं निरनिराळ्या आकाराच्या, निरनिराळ्या रंगाच्या व वरील अक्षरांची निरनिराळ्या खुबीनें मांडणी करून लिहिलेल्या असाव्या. तसेंच वाजतगाजत त्यांची प्रसिद्धपणे व लोकांस दिसेल अशा रीतीनें मिरवणूकही काढली पाहिजे. हल्लीं मुंबई, पुणें वगैरे शहरांतून हा प्रघात सुरू झाला आहे व तो पुष्कळ अंशीं फायद्याचा असल्याचें नाटकमंडळीच्या अनुभवासही आलें आहे.हस्तपत्रकें तर बहुतकरून ठरीव सांचांतली झालीं आहेत: व छापखानेवाल्यांना नाटकांच्या नांवाचे व तारखेचे खिळे उचटण्याखेरीज इतर मजकूर बदलण्याचा फारसा प्रसंग येत नाही. कांहीं कांहीं नाटकमंडळ्या नाटकाचा सारांश व नाटकांत देखावे किती आहेत यांची त्रोटक माहिती देतात. पण आमच्या मतें याही पेक्षां हस्तपत्रकांत सुधारणा झाली पाहिजे; व ती अशी कीं, हस्तपत्रक हातांत पडतांच लोकांना तें वाचण्याची जिज्ञासा झाली पाहिजे. इंग्रजीमध्यें विनोदपर व खुबिदार शब्दांत हस्तपत्रकें लिहिण्याचा प्रघात फार दिवसांपासुन पडला आहे, व उत्तरोत्तर तो जास्तच वाढत चालला आहे; व त्यामुळें ती वाचतां वाचतांच लोकांची