करमणूक होऊन त्याबरोबर नाटकप्रयोग पाहण्याचीही
त्यांची उत्कंठा वाढते. इंग्रजी भाषेतील अशी हस्तपत्रकें
पुष्कळ देतां येण्यासारखें हें स्थळ नसल्यामुळे गोल्ड
स्मिथचे ‘ शी स्टूट्स टु काँकर' हें नाटक रंगभूमीवर
येतेवेळीं विलायतेंत कॉमेडीसंबंधाने झालेला ग्रह पालट
ण्याच्या हेतूनें जो एक खुबदार चुटका प्रसिद्ध झालेला
आहे तो मासल्याकरितां येणें देतोः
" It is with much pleasure," writes the morning
Chronicle on the occasion of his benefit night " we can
inform the public that the ingenious and engaging
Miss Comedy is in a fair way of recovery. This much
admired young lady has lately been in a very declin
ing Way and was thought to be dying of a sentiment
al consumption. She is now under the care of Dr.
Goldsmith who has already prescribed twice for her.
The medicines at extremely easy upon her stomach
and she appears to be in fine spirits. The Doctory is
to pay her a third visit this evening, and it is expect-
ed he will receive a very handsome fee from the
Lady's friends and admirers."
मराठींत शाहूनगरवासी मंडळीचीं एक दोन हस्त
पत्रकें पूर्वी थोडया निराळ्या धर्तीवर लिहिलेली आह्वांस
पाहण्यास मिळालीं आहेत. ती वाचकांच्या माहि
तीसाठीं मुद्दाम येथे देतों
छे बोवा, रात्र अंधेरी, तशांतून पावसाची झिमझिम, रस्त्यां
तन चिखल आणि म्युनिसिपालिटीच्या कंदिलांचा दुष्काळ ! अशा
वेळी दिवसाचे नाटक बघण्याचे सोडून कोण जातो रात्री त्रासांत
पडायला ! तशांतूनहीं गेलो असतो; परंतु हे दिवस पडले पावसा-
पान:मराठी रंगभुमी.djvu/२५५
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२१
भाग ३ रा.