ही माझी चुगल्या सांगण्याची सवय अलीकडे फारच वाढली
आहे असे माझे मलासुद्धां वाटू लागले आहे. तेव्हां चुगलखोर
पणाच्या भयंकर परिणामांचे चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभे राहून
त्यापासून माझ्या आंगचा हा घातक दुर्गुन ज्याच्या योगनें
नाहीसा होईल, असें एखादं नाटक आहे काय ?
नोकरः-माझें निम्में अधिक आयुष्य दुस-यांची चाकरी
करण्यांतच गेलें ! ह्या मुदतींत स्वदेशच्याबद्दल मला कधीं आठवणसुद्धां झाली नाही. स्वदेशभक्ति म्हणजे काय ह्याची माझ्या मनाला कल्पनासुद्धां ठाऊक नाही. त्या स्वदेशभक्तीशी माझा
परिचय कशाने होणार; कारण आपल्या इकडे तिचा प्रत्यक्ष
अनुभव येणें शक्यच नाही. कदाचित् एकाद्या नाटकांतून त्या
स्वदेशभक्तांचे उत्तम चित्र असलें तर असावयाचे; पण असें
कोणतें वरें नाटक आहे ?
सगळ्यांना एकच उत्तरः-'कांचनगडची मोहना’ पहा.
इंग्लंड व अमेरिका या देशांत नाटकाच्या पडद्यावर
व्यापारी वगैरे लोकांच्या जाहिराती देण्याचा प्रघात आहे
व स्पेनमध्ये तर लोक बसावयाच्या बांकखुर्च्याचे पाठी
वरही जाहिराती देत असतात. तसा प्रकार आमच्या इकडे
अद्याप फारसा दृष्टीस पडत नाही. अलीकडे ‘ नाट्य
कलाप्रवर्तक संगीत मंडळी ' नें आपल्या हस्तपत्रकावर इतर
लोकांच्या जाहिराती घेण्याचा प्रघात सुरू केला आहे;
व अनुकरण किलोस्कर मंडळीनेंही केले आहे.
या प्रघातापासन नाटकमंडळ व जाहिराती देणारे या उभयतांचाही फायदा आहे. तेव्हां तो प्रघात उत्तरोत्तर वाढवण्यास कांही हरकत दिसत नाहीं.
पान:मराठी रंगभुमी.djvu/२५७
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२३
भाग ३ रा.