पान:मराठी रंगभुमी.djvu/२६०

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२६
मराठी रंगभूमि.


 (४) बैठकीची जागा करावयाची तीही ज्वाला प्रशामक पदार्थाची करावी. उदाहरणार्थ, कांहीं एक रसायन द्रव्य घालून तयार केलेला एक विशेष प्रकारचा कागद ( compressed paper ) याची करावी आणि पाठीमागे टंकावयास असतें तें केशप्रपूरित असावें
 (५) पडदे वगैरे होतां होईतों रेशमाचे अगर लोकरीचे करावे.
 ( ६ ) पडद्यांस रंग देणें तो एक तन्हेची खळ आहे. ती खळ आणि डिंकाचे पाणी या मिश्रणानें था. टरपें टाईन अगर साधे तेल यांचा उपयोग करू नये.
 (७ ) जमिनी करण्याकडे चुना व खडी (concrete) अगर जमीन करण्याची कवळे यांचा उपयोग
 (८) नकशी काम करणे असल्यास लोखंडाची मदत घ्यावी.
 (९) रंगभूमीचा शेवट आणि प्रेक्षकांची बसण्याची जागा यामध्यें एक भला जंगी लोखंडाचा पडदा असावा. यास खालींवर करण्याचे साधन असावें. आग लाग ल्याची आरोळी झाल्याबरोबर त्या पडद्यस विरेंत घालतां यावें.
 असो; येथवर या भागांत नट, नाटकमंडळ्या, ग्रंथकार वगैरेंस मला ज्या कांहीं सामान्य सूचना कराव्याशा