पान:मराठी रंगभुमी.djvu/२६१

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२७
भाग ३ रा.


वाटल्या " त्या मी केल्या आहेत. आतां याबद्दल विद्वानांचे काय विचार आहेत ते मी पुढें देतों-

नाट्यकलेसंबंधानें विद्वानांचे विचार.
आरंभी नाटकांचा नैतिक सुधारणेकडे
कितपत उपयोग होत असे ?

 नैतिक सुधारणेचा दुसरा मार्ग म्हटला म्हणजे नाटकें हा होय. कांहीं अति उत्तम व कांहीं अति नीच अशा थोड्या पात्रांचा एके ठिकाणी समावेश करून त्यांतील सदाचरण पात्रांचा उत्कर्ष आणि दुराचरण पात्रांचा अपकर्षे, ही प्रेक्षकांना चटकदार रतिर्नेि दाखवून त्यांच्यामध्ये सद्रुणांविषयीं नैसर्गिक प्रीति आणेि दुर्गुणांविषयी कंटाळा उत्पन्न करणे, ह्य नाटक करण्याचा मुख्य उद्देश होय; आणि अज्ञान व असमंजस लोकांत तो पूर्वी च्या काळी बराच तडीस गेला यांत संशय नाही. याविषयी जी एक मजेदार गोष्ट ऐकण्यांत आली ती येथे सांगितल्यावांचून राहवत नाही. सबब ती खालीं देतो -एका लहान खेड्यांत अडाणी लोकांसमोर सीताहरणाचा प्रयोग एक नाटकमंडळी करून दाखवीत असतां ज्या वेळेस रावण सीतेस नेऊ लागला आणि सीता आक्रोश करु लागली त्या वेळेस प्रेक्षक जनांतील एक कुणबी हातांतील सोटा उगारून सीतेच्या मदतीसाठी पुढे होऊन आपल्या इतर स्नेही मंडळीस तिला सा करण्याकरितां बोलावू लागला ! या लहानशा गोष्टीवरून अडाणी लोकांत नाटकाच्याद्वारे सणांचे बीजारोपण कसें व कितपत करतां येत असे, याची सहज कल्पन होईल. परंतु जसजसा ज्ञानाचा प्रसार अधिकाधिक होऊ लागला, तसतसें नाटकांचे खरें महत्व कमी होऊ लागले. त्यांचा विशेषसा परिणाम मनावर होईनासा झाला. प्रत्येक आठवड्यांतून कमीत कमी निदान दोनदां तरी-किंबहुना तीन चार वेळ मुद्धां-जेव्हां सीतेचें अगर