पान:मराठी रंगभुमी.djvu/२७८

हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४४
मराठी रंगभूमि.


अथेल्लो नाटकांत कांहीं वैगुण्य आलेलें मुळींच दिसत नाहीं. प्राचीन काळीं आपल्या देशांत नाटकाचे पॅयोग बहुधा राजवाड्यांत किंवा भव्य सभामंडपांत अथवा उघड्या मैदानावर होत असल्यामुळें आणि नाटकांतल्या नानाविध प्रसंगांचे देखावे दास विण्याचे रंगीत पडदे वगैरे सामान त्या काळच्या लोकांस ठाऊक नसल्यामुळें, नाटकांतले सगळे प्रसंग एकाच स्थलीं दाखविणें भाग पडत असे. तीच कचेरी, तोच दरबार तोच राजकन्येचा महाल, तीच स्मशानभूमि, तेंच वन आणि तोच समुद्रकांठ; सगळें कांहीं एकाच जागेंत कल्पिणे भाग पडे. अशा स्थितींत स्थलैकतेबद्दल कडक नियम घालून ठेवणें आमच्या नाट्याचार्योस योग्य वाटलें यांत नवल नहीं. तथापि, आतां पूर्वीची स्थिति अगदीं बदलली आहे. आतां नदी, मेघ, वीज, अरण्य राजमहल, लतामंडप वगैरे भिन्न भिन्न देखावे दाखविण्याचा उपकरणें आयतीं तयार मिळतात. फार काय, पण मुंबईच्या गुजराथी नाटकांतून आगगाडी व ट्रामगाडीसुद्धां रंगभूमीवर चालवीत आणतात ! तेव्हां अशा सर्व तऱ्हेच्या सोयी असल्यावर स्थलैकतेच्या निरर्थक नियमानें नाटकास जखडून टाकण्यांत काय हांशील आहे ? सारांश, वर म्हटल्याप्रमाणें नाट्यदेवतेच्या पायांत निरर्थक नियमांच्या श्रृंखला घालून तिच्या स्वातंत्र्याचें हरण करण्याचें पाप माथी न घेतां नाटककार तिच्या स्वातंत्र्याचे रक्षण करतील तर ती कला लवकर ऊर्जितावस्थेला येइल.

विविधज्ञानवविस्तार,-लेखनव्यवसय १९००.

नाटकांत कोणते प्रसंग घालूं नयेत ?

 नाटकप्रयोगांत कोणते प्रसगं रंगभूमीवर दाखवावे व कोणते दाखवूं नयेत याविषयीं आपल्या ऋषींनीं व अर्वाचीन इंग्रज नाट्याचार्यांनी स्पष्ट नियम घालून दिले आहेत. त्यांचें उल्लंघन करणें कोणत्याही तऱ्हेनें इष्ट नाही असे मला वाटतें. मृत्यु, दंश, कंडूयन ( आंग खाजविणें ), आंगास अगदीं स्पर्श करून चुंबन