नाटककर्त्यानें दिलेल्या मर्यादेचा अतिक्रम केल्याचा दोष अशा
ठिकाणीं नटावर येत नाही.
सयाजीविजय, २१।६।०२.
शकार-ले. अ. वा. बरवे.
गद्य कोठें वापरावें व पय कोठें घालावें यासंबंधाने जरी कडक
निर्वेध नाहीं, तथापि, सृष्टिसौंदर्य, हावभाव स्वभाव अथवा
स्वरूप याचें हृदयंगम व सरस वर्णन, मनोविकार, उदात्त कल्पना,
अर्थांतरन्यासाने गुंफिलेले सामान्य सिद्धांत, इत्यादि प्रकार प्रायः
पद्यांत वर्णिलेले असतात. संस्कृत नाटकांमध्ये पद्याचे अगोदर
‘ अतोहि, ’ ‘यतः, ’ ‘कुतः, ' ‘ अपिच, ' असे शब्द
प्रायः असतात व त्यावरूनही आमच्या वरील विधानाची सत्यता सिद्ध
होणार आहे. जे विचार पद्यरूपानें सांगितले असतां त्यांचा
गद्यपेक्षां विशेष ठसा उठतो व ज्यामुळें रसाचा परिपोष होतो
तेवढेच पद्यांत आणावे. पद्यांत घालावयाचे विचार गद्यांत घातल्यामुळे
रसहानि कशी होते याचें एक ढळढळांत उदाहरण
गुप्तमंजूषांत आहे. सौदामिनी आपल्या नवऱ्याचे डोकें मांडीवरून
खालीं ठेवितांना गद्यांत विलाप करिते व तो विलाप अलंकारिक
आहे. या भाषणामुळें प्रेक्षकांस रडूं येण्याचे ऐवजीं हसूं मात्र
येतें.शब्दावरील शुल्लक कोट्या गद्यांत व पद्यांत कशा दिसतात हें
खालीं दिलेल्या एकाच मासल्यावरून ध्यानांत येण्यासारखें आहे.
त्राटिकेस प्रतापरावानें बाई हें उपपद न लाविल्यामुळें जसा
तिला राग आला तसाच विक्रांतानें सरोजिनीस न ह्टल्यामुळें
तिलाही आला. परंतु प्रतापरावानें काय तुला मुलें होऊन खपड
झालेल्या खीप्रमाणे वाई म्हणूं ? जो कोणी असा अपराध करील
त्याची मारे चामडी लोळविलेली पाहिजेत, अशा आशयाचे
दिलेलें उत्तर व विक्रांताचे "न बहुवचनाला जागा कांहीं एकव
चन कृतार्थचि होई" असें पद्यमय उत्तर यांत सरस कोणतें,
याचा वाचकांस निर्णय करितां येण्यासारखा आहे.
कल्पतरु-ता. ६|७|१९०२.