समजत असेल तरच शब्दांचे ध्वनि ऐकून कोणाचें अंतःकरण
हलेल. शिवाय शब्दार्थाचेंही पूर्ण ज्ञान असवें लागतं. तें नसल्याकारणाने अडाणी मनावर पुष्कळ वेळां भाषणांचा कांहींच परिणाम होत नाही. परंतु अभिनय ही सर्व जगाची एक भाषा आहे
मनुष्यमात्रांचे मनोभाव एकरूपच असल्यामुळे ज्यांत ते स्वभावतः
सारखेच दृष्ट होतात असे अभिनय सवना सहज ओळखीचे वाटतात आणि त्यामुळंच समजतात.
या दृष्टीने अभिनयाच्या खालोखाल जरी भाषणाचें महत्व
असल्यासारखे दिसते तरी ते अभिनयाशी अनुरूप राखले असतां
अभिनयाचा स्पष्ट बोध अधिक होण्यास कारण झाल्यावांचून
राहत नाही. गाणाराला सुरांची सांथ बरोबर मिळाली म्हणजे
त्याचे स्वर ज्याप्रमाणे अधिक ठळक आणि एक प्रकारे जास्त
कर्णमधुर असे प्रत्ययास येतात किंवा डोळ्यास बरोबर लागणारा
चष्मा जसा त्या डोळ्यांना बाहेरचा देखावा अधिक रम्य दाख
वितो त्याचप्रमाणें अभिनय आणि भाषण यांच्या एकरूप साहच
यांचा प्रभाव आहे. हें सालचय राखणाराच उत्तम नट होय व
अशा नटाचा नाट्यप्रयोग पाहिल्यानेंच प्रेक्षकांच्या मनाला उत्तम
आनंद होतो. “वचस्येकं मनस्येकं कर्मण्येकं दुरात्मनाम् ’ ही जशी
दुर्जनाची व्याख्या त्याचप्रमाणे विषय एक, अभिनय दुसराच
आणि आपण तिस-या तऱ्हेंचे हें वाईट नटाचें लक्षण आहे.
अशा नीच पात्रांनी केलेली नाटकें पाहण्यांत फारच दोष सांगि
तलेला आहे. ‘अभिनयदर्पण’ नामक ग्रंथांत यासंबंधाने म्हटले
आहे कीं:-
नीचपात्रकृतं नाट्यं यदि पश्यंति मानवाः ।
पुत्रहीना भविष्यंति जायन्ते पशुयोनिषु ॥
याच ग्रंथांत उत्तम अभिनयासंबंधाने सांगितलेलेही पुढील
दोन सूचक श्लोक लक्षात ठेवण्यासारखेच आहेत:-
यतो हस्तस्ततो दृष्टर्यतो दृष्टस्ततो मनः ।
यतो मनस्ततो भावो यतो भावस्ततो रसः ॥
पान:मराठी रंगभुमी.djvu/२८५
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५१
भाग ३ रा.