पुष्कळांनीं रा. आण्णा किर्लोस्कर हेच संगीताचे उत्पादक असें म्हटलें आहे; पण ती चूक असून वास्तविकपणें हा मान रा.त्रिलोकेकर यांसच मिळाला पाहिजे,हें रा. जनार्दन महादेव गुर्जर यांनीं रा.त्रिलोकेकरकृत जें संगीत 'हरिश्चंद्र' नामक नाटक प्रसिद्ध केलें आहे त्याच्या प्रस्तावनेवरून दिसून येईल. ते ह्मणतात:-" सन १८७१ सालीं मुंबईमध्यें एल्फिन्स्टन कॉलेजांतील विद्यार्थ्यांनीं संस्कृत शाकुंतल नाटकाचा प्रयोग केला तो गद्यपद्यात्मक रीतीनें केला. त्यांतील श्लोक,-पदयें प्रत्येक पात्रानें स्वतः रागरागिणींत म्हटलीं. तो प्रयोग संस्कृत होता तरी गायनयुक्त असल्यामुळें सर्वसाधारण मनाेरंजनास कारणीभूत झाला. तेव्हांपासून त्रिलोकेकर यांच्या कवित्वशक्तीस स्फूर्ति येऊन आपल्या महाराष्ट्रभाषेंत असला प्रयोग करावा असें त्यांस वाटूं लागलें, व त्याप्रमाणें त्यांनी सन १८७९ सालीं जानेवारीमध्यें गद्यपद्यात्मक 'नलदमयंती' नाटक छापून प्रसिद्ध केलें. पुढें तीन चार महिन्यांनीं त्याचे प्रयोगही होऊं लागलें. हे प्रयोग'हिंदुसन्मार्गबोधक मंडळीं 'नें नाट्यकलाभिज्ञ रा शंकर मोरो रानडे, संगीत शास्त्रज्ञ वासुदेव नारायण डोंगरे आणि नारायण हरि भागवत वगैरे नाटकप्रिय लोकांच्या देखरेखींत व शिकवणीनें केले. तेव्हां त्यावेळीं या अपूर्व महाराष्ट्रनाटकप्रयोगांबद्दल वर्तमानपत्रांतून चांगले चांगले उद्गार निघून पत्रकारांनीं सोकरजीकडे गद्यपद्यात्मक किंवा संगीत
पान:मराठी रंगभुमी.djvu/104
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८८
मराठी रंगभूमि.