होता काय? या आक्षेपासंबंधानें लिहितांना केसरीकारांनीं पुढील उद्वार काढले आहेतः-" नाटकवाल्यांवर सर्वात पहिला मोठा टपका म्हटला म्हणजे हा कीं, ते लोकांचा पैसा बुचाडतात. संगीतवाल्यांवर तर हा एक मोठाच गहजत्र आह. किर्लोस्कर आणि को० म्हणजे सरासरी वासुदेव बळवंत आणि को० हिच्याच तेोडीची कंपनी ! वा: केवढें जबरदस्त दूषण हें! संगीतवाल्यांनीं लोकांच्या हातावर गुळखोबरें ठेवून त्यांचें पागेोटें हिरावून घेतलें काय ? किंवा आमच्या कायदेकौंसिलांत चार दाढ्या एके ठिकाणीं मिळाल्या कीं, लोकांपासून लक्षावधि रुपये लुंगावण्याचें हत्यार जसें ताबडतेवि तयार होतें, तसा तर दुष्यंत महाराजांनीं एखादा आक्ट झोंकून दिला नाहींना! या विलक्षण आरोपावरून आम्हांस आथिल्लीवर आणलेल्या आरोपाची आठवण होते. त्याच्या क्ष्वशुरांनीं जसें त्याजवर बालंट घेतलें कीं, या दुष्टानें माझी पोर भारून टाकेिली आणि त्यामुळे ती याच्या नादीं भरली आहे; त्यासारखाच प्रस्तुत भरतपुत्रावर हा कांहीं अरसिक किंवा मत्सरी मंडळीचा टेला आहे. यावर समर्पक उत्तर म्हटलें म्हणजे शेक्सपीयरच्या नायकानें राजदरबारापुढ़ें जें दिलें तेंच होय. आमचें तर या प्रकरणीं असें ठरीव मत आहे की, उत्तम नाट्य ही मनोरंजनाच्या उत्तम पद्धतींपैकीच एक ही; ती अत्यंत निर्दोष असून तीस इतर कलांप्रमाणें
पान:मराठी रंगभुमी.djvu/120
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०२
मराठी रंगभूमि.