पात्रें मुख्य असून त्या सर्वांच्या तोंडीं गाणें घातलें आहे. त्यांत पहिल्या दोन अंकांत मंथरेच्या तोंडीं पुष्कळ पद्ये घातलीं असून आण्णांच्या नाटकाची सर्व मदार काय ती त्या पात्राच्या करामतीवर होती. ही भूमिका रा. भाऊराव हे करीत असत, व ती करतांना आपल्या सुस्वर गाण्यानें व अभिनयानें लोकांस ते असें कांहीं मोहित करीत कीं, सर्वांच्या तोंडून ‘ धन्य धन्य' असें म्हणवून घेत. या नाटकांत भाऊराव जीं पद्ये म्हणत तीं बहुतेक चढया सुरांत म्हणत, व त्यामुळे त्यांना कामही कसून करावें लागत असे. या वेळीं भाऊराव हे ऐन उमेदिंत असून त्यांची आवाजीही फार खुललेली होती. शिवाय खासगी रीतीनें गायनकलेची थोडीबहुत उपासना चालविल्यामुळे त्यांचें मंथरेचें कुम इतकें कांहीं अप्रतिम हेात असे कीं, प्रेक्षकांपैकी प्रत्येकाच्या तोंडून असें पात्र पुन्हां होणार नाहीं ' म्हणून वेळोवेळीं उद्वार निघत. ‘ व्यर्थ आम्ही अबला,' ' सुटला पितृदिशेचा वारा,' नृपममता रामावरती,' ' मन माझें भडकुनि गेलें, ' ' उद्या बघ जातें,’ ‘ सुकुमार असुनि तूं फार ' इ० मंथरेचीं पद्ये व चूर्णिका भाऊरावांच्या तोंडून ज्यांनीं ऐकलीं असतील त्यांना आमच्या वरील म्हणण्याची सत्यता तेव्हांच कळून येईल. या नाटकांत रा. मोरोबा हे वसिष्ठाचें काम करीत असून रा. नाटकर हे शंबुकाचें काम करीत असत; व हीं दोन्हीं कामें
पान:मराठी रंगभुमी.djvu/124
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०६
मराठी रंगभूमि.