पान:मराठी रंगभुमी.djvu/125

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०७
भाग २ रा.


सदर इसमांच्या आंगच्या गुणानुरूपच होत असत. आण्णा स्वत: दशरथाचें काम करीत तंही चांगलं होत असे.
 रा. त्रिलेोकेकर व किर्लोस्कर यांचीं नाटकें म्हणजे 'संगीत पौराणिक नाटकें' म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. या नाटकांत त्यांनीं संगीताखेरीज पूर्वीच्या गद्यपौराणिक नाटकांपेक्षां पुष्कळ सुधारणा केल्या. गजानन, सरस्वती, विदूषक या पात्रांस रजा देऊन मंगलाचरणाकरितां आरंभीं दोन सांथीदारासह सूत्रधारास रंगभूमीवर आणलें; व नंतर नटीचा आणि त्यांचा संवाद करून नाटकास सुरवात केली. याखेरीज आणखी एक मोठी सुधारणा जी केली ती पात्रांच्या वेषासंबंधानें होय. पूर्वीच्या गद्यौराणिक नाटकांत नल, हरिश्चंद्र, दुष्यंत, अर्जुन, बळिराम, दशरथ अशांसारखीं पात्रें रंगभूमीवर आलीं तर त्यांना बेगडीचे किरीट, कुंडलें, भुजा वगैरेंनीं सजवीत असत. ती चाल मोडून रा. त्रिलोकेकर व आण्णा यांनीं नल, दुष्यंत, अर्जुन वगैरे पात्रांस अलीकडच्या राजघराण्यांतील थाटावर श्रीमंती पोषाख देऊन त्यांना रंगभूमीवर आणिलें. तसेंच कृष्णाचे चार हातांचे दोन हात केले, व त्याच्याही किरीटकुंडलांस रजा दिली. त्याचप्रमाणें सुभद्रेला उचलून नेणा-या राक्षसांतही फरक पुडला. पूर्वी राक्षसाचें सोंग कशा प्रकारचं आणीत असता हें मागें सांगितलेंच आहे. तसें सोंग या संगीत नाटकांत न आणतां इंग्रजी नाटकांतील बफूनच्या धर्तीवर अथवा घोड्याच्या सरकसींतील विदूषकाच्या धर्तीवर पोषाख देऊन