पान:मराठी रंगभुमी.djvu/126

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०८
मराठी रंगभूमि.


त्यास रंगभूमीवर आणिलेें. तसेंच त्याच्या आरडाओरडीस फांटा देऊन अंमळ मोठ्यानें पण साधारण माणसें बोलतात त्याप्रमाणें त्यास बोलावयास लाविलें. आण्णांच्या नाटकांत जंगल, बाग, महाल वगैरे नेहमींच्या देखाव्याखेरजि ऋषीचा आश्रम, पर्वतावरील गुहा, तुरंग वगैरे श्रम घेऊन तयार करण्यासारखेही कांहीं देखावे होते; पण त्यांनीं त्या देखाव्यांकडे विशेष लक्ष न पुरावतां ते साधेच केले होते. त्यांचें मुख्य लक्ष नाटकांतील पात्रांची निवड, हुशारी व कसब यांकडे होतें, व त्याप्रमाणें त्यांनीं तशी पात्रही पैदा केली होती. हीं पात्रे गाण्याच्या कामांत कशीं होतीं हें वर सांगितलेंच आहे. पण गाण्याखेरीज चेहरा, आंगलोट, तेंडावरील तेज, वगरेंतही तीं चांगलीं होतीं. रा. मोरोबा वाघूलीकर यांनीं दुष्यंताचें सोंग घेतल्यावर ते ख-या-खुन्या राजाप्रमाणें दिसत असत. तसेंच सुभद्राहरण करण्याकरितां त्रिदंडी सन्यास घेतला म्हणजहही ते एखाद्या तेजस्वी सन्याशाप्रमाणें दिसत. रा. नाटेकर यांचें कण्वाचें सोंग ज्यांनीं पाहिलें असेल त्यांना एखाद्या प्राचीन तपोनिष्ठ सिद्ध ऋषीची आठवण झाल्यावांचून कधीं राहणार नाहीं. शकुंतला सासरी जाण्याच्या हेतूनें शेवटचा निरोप घेण्याकरितां हात जोडून पुढें उभी गुहिली आहे आणि तिला सासरी कसें वागावें, याबद्दल उपदेशाच्या दोन गोष्टी सांगून कण्व तिच्या डोकीवर वरदहस्त ठेऊन शेवटचा निरोप देते आहे, हें शाकुंतल नाटकांतील देखाव्याचें चित्रशाळेनें फोटो-