पान:मराठी रंगभुमी.djvu/133

हे पान प्रमाणित केलेले आहे.
११५
भाग २ रा.


करून पूर्वीचींच शाकुंतल, सौभद्र व रामराज्यवियोग हीं नाटकें करावीं. पण ज्या नाटकांत आपण स्त्रीपार्ट घेऊन लेोकांचें चांगल्या रीतीनें मनोरंजन केलें व ज्याचा ठसा लेोकांच्या मनावर इतक्या चांगल्या रीतीनें उमटला आहे, तो ठसा कायम राहणार नाहीं, व त्यामुळे कंपनीनें मिळविलेला नांवलौकिक जाऊन कंपनीला द्रव्याचीही प्रामि होणार नाहीं असें वाटून त्यांनीं तो विचार सोडून दिला,व कंपनी सोडून घरी स्वस्थ बसावें असेंही त्यांच्या मनानें घेतलें. पुढें कंपनी मोडणार असें ठरूनच शेवटचे शेवटचे खेळ होऊं लागले, व लोकांनींही आपणांला भाऊरावांचें काम याउप्पर पहावयास मिळणार नाहीं असें ह्मणून कंपनीस चांगला आश्रय दिला. ही कंपनी आजपर्यंत वर सांगितल्याप्रमाणें नांवलौकिकास चढून ती आतां लयास जाणार असें पाहून कंपनीच्या कित्येक हितचिंतकांनीं व भाऊरावांच्या खेह्यांनीं कंपनीत कांहीं तरी निराळी सुधारणा करून ती तशीच पुढें चालवावी अशी सला दिली; व भाऊर्वांनुाही ती सला पसंत पडून त्यांनीं कंपनीचें काम चालू ठेविलें. या कंपनीला निराळे स्वरूप प्राप्त होऊन तिच्या इतिहासाच्या दुस-या भागास येथून सुरवात ली. हा भाग सुरू करण्यापूर्वी किर्लोस्कर कंपनीच्या समकालीन असलेल्या डोंगरे वगैरे गृहस्थांच्या कपन्यांची हकीकत सांगणें इष्ट आहे ह्मणून तिकडे आतां वळूं.