पान:मराठी रंगभुमी.djvu/140

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२२
मराठी रंगभूमि.


इच्छेप्रमाणें हवी तितकी स्वतंत्रता घेत असल्यामुळे नाटकांतल उद्दिष्ट हेतूचा परिणाम लोकांच्या मनावर न होतां उलट ग्राम्य करमणुकीस एक प्रकारें उत्तेजन दिल्यासारखे झालें. उत्तम संविधानक घेऊन रचलेल्या नाटकांत मधून मधून अशा प्रकारची ग्राम्य करमणूक घुसडून न देतां रा. डोंगर यांना तशा प्रकारचे स्वतंत्र नाटक रचलें आहे, तरी पण तें समाजावर परिणाम करण्यासारखे झालें नाहीं एवढी गोष्टी खरी आहे. असो; या एका नाटकाखेरीज डोंगरे यांचीं बहुतेक सर्व नाटकें चांगलीं असून त्यांचे प्रयोगही चांगले होत असत. यांची कंपनी तशीच पुढें चालुली असती तर त्यांच्या हातून दुसरे अनेक चांगले प्रयोग झाले असते अशी आशा करण्यास पुष्कळ जागा होती. पण कंपनींतल्या मंडळींत रहावी तशी जूट न राहिल्यामुळे व पुढें पुढे डोंगरे यांस अव्यवस्थेमुळे कर्ज पुष्कळ झाल्यामुळे कंपनीस लवकरच राम म्हणावें लागलें !

वॉईकर कंपनी.

रागबद्ध संगीत नाटकाच्या प्रयोगांस 'वांईकर कंपनी' कडून कांहीं दिवस चांगलीच प्रगति मिळाली. या कंपनांचे मालक व चालक रा. पांडुरंग गोपाळ गुरव यवतेक्ष्वकर् हे असून त्यांनीं पूर्वीच्या नामांकित गवयाजवळ गायनकलेचा यथाशास्त्र अभ्यास केला असल्यामुळे अनुभवानें नाटकांत लोकांस रुचतील अशा पुष्कळ सुधारणा