पान:मराठी रंगभुमी.djvu/143

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२५
भाग २ रा.


ती ही कीं. भूमिका वेणान्या इसमांपैकीं बहुतेक इसम गुरव होते. इतर कंपनींत ब्राह्मण पात्रं असूनही प्रयोग चांगले होण्याची मारामार पडते. पण यवतेश्वरकरांच्या नाटकांत गुरव पात्रे असून त्यांचें गाणें व भाषण इतकें शुद्ध होतें कीं, पुष्कळांना तीं पात्रे ब्राह्मण नाहींत असा संशयही येत नसे; व ही गोष्ट खरोखर तारीफ करण्यासारखी आहे.

नाटयानंदकंपनी.

 याच सुमाराची साधारणपणें चांगली अशी संगीत नाटककंपनी ह्मटली ह्मणजे ' नाटयानंद ' ही होय. ही मंडळी 'ललितकलोत्सववर्धक'* म्हणून जी नाटकमंडळी होती त्यांतील पात्रं फुटूनच बनली होती. पण तींत कांहीं कांहीं पाचें नांवाजण्वासारखीं असून तिचे प्रयोगही बरे होत असत. या मंडळीचा हातखंडा खेळ ह्मटला ह्मणज ' मृच्छकटिक ’ हा होय. हें नाटक मूळ संस्कृत भाषेत असून त्याचा कर्ता शूद्रक कवि आहे. यांतील संविधानक पौराणिक कथाभागावर रचलें नसून व्यवहारांत घडून येणा-या साध्या गोष्टींवरच रचलें आहे व त्यांतील पात्रें


 * मंडळींत देखावे मात्र अश्मतिम होत असत; बाकी इतर कामें यथातथाच होत. या मंडळचेिं मुख्य नाटक 'विक्रमवंशीय' असून यांत पुढील देखावे करण्यांत येत असतः-' (१) अप्सरा (अधर) प्रवेश करिते. (२) जंगलाचा देखावा. (३) पावसाचें गड़गडणें च विजा चमकणें. (४) संगमनीय मणी गृधृपक्षी घेऊन जातो. (५) सिंहासनाचा देखावा.