पान:मराठी रंगभुमी.djvu/148

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३०
मराठी रंगभूमि.


असल्यामुळे संविधानक चांगलें सांपडून व्यक्ति, स्थलें व कल्पना याही उदात्त आणि उन्नत अशा असल्यामुळे नाटक भारदस्त होई; किंवा कालिदास, शूद्रक, भवभूति, इत्यादि ज्या महान् संस्कृत कवींनीं अगोदरच नाटकांवर परिश्रम केले होते त्यांचीं नाटकें भाषांतर रूपानें मराठींत आणल्यामुळे अनायासेंच तीं हृदयंगम होऊन मराठी रंगभूमीस शोभा येई. पण रा. पाटणकर यांनीं हा मार्ग सोडुन देऊन कसला तरी नीरस कथाभाग घेऊन व पुढें पुढे तर मन:कल्पित गोष्टी घेऊन त्यांवर नाटक रचावें, असा प्रकार चालविल्यामुळे नाटकांतील भारदस्तपणा नाहींसा होऊन त्याची गोडी कमी झाली. दुसरी गोष्टरा. पाटणकर यांची कवित्वशक्तिही * कमी दर्जाची असल्यामुळे व उष्ट्या कल्पना आणि उष्टे विचार जागजागीं घुसडून दिल्यामुळे तिकडूनही नाटकास कमीपणा


 * सदर निबंध पुस्तक-परीक्षण-विषयक नसल्यामुळे पाल्हाळ न लाविंतां रा. पाटणकर यांच्या नीरस कवितांचे कांहीं मासले त्यांच्या नांवाजलेल्या नाटकांतून येथें देतों:-
 " पुरे पुरे ही कपटस्तुती । किप्ति आहें मजवरि आपुली प्रीति॥ अर्स खचित मी समजुनी ती ॥धृ० ॥इ० '-विक्रमश. अंक २ रा.
 " पृथ्वीनाथा गर्वोफीचे करितें तुकड़े हं हं ह्मणतां " इ०

--किंता अंक ३ रा.

 " छाबड्या नकोरे दृष्ट । करूनि मन घट्ट । येउनी घट्ट भेट दृद्याला '

--किंता अंक ५ वा.

 " हूँ हूँ। रावकुलभूषा पच प्राणावर का रुसवा ? इ०

--कित्ता अंक ५ वI.