पान:मराठी रंगभुमी.djvu/152

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३४
मराठी रंगभूमि.

व उपदेश करितें तो हृत्पटलावर कोरून ठेवा. माझ्या प्रसादानें तुह्मांला आतां तें घाणेरडें अलंकारशास्त्र, तर्कशास्त्र, तें कुन्तित व्याकरण, भाषेचें रहस्य, गंभीर विषय, सृष्टपदार्थीचें निरीक्षण, कल्पनाशक्ति, पद्यरचनारहस्य, यमकनिर्बंध, राग, ताल, सूर व योग्यायोग्यतेचे सूक्ष्मविचार यांची कांहीं एक गरज राहिली नाहीं बरें. पुत्रकांनो, मी आतां अगदीं बेताल झालें आहें बेताल ! तुह्मी ताल, सूर, राग, यांचा नामनिर्देश करण्याच्या भानगडीत तरी कां पडतां ! खुशाल लिहीत चला, " ताल-बेताल, सूरबद्सूर, राग -बेराग, ' असें ! त्याखालीं खुशाल तुमच्या डोक्यांत येईल व जिव्हाग्रीं उत्तरेल ती साधी अगर भयंकर अथवा विचकट कृल्पना तोंडांतून निघतील तीं वाक्यें, लेखणीतून उतरतील ते शब्द खुशाल दडपीत चला ! भिकारडया विद्वानांची भीड तिळभर धरूं नका बरें ! ताला ता, पाला पा, नाला ना, द्या वाटेल तसा जडूोन ! मला आवडतें आहे, मग तुह्मांला भीति तरी कोणाच्या बापाची !

"मी हिचा पती, या जगीं असे ।।
ह्मण्णूनि ह्निजास मी संग करितसे ।।

 "बस्स! हे इतकें साधे तर्कज्ञान मला फार आवडतें. या लिहिण्यात कोणी अश्लील ह्मणेल तर माझें नांव सांगून त्याचा कान उपटा; व विचारा कीं, शहाण्याच्या कांद्या, हें वाक्य तोंडांतून नटानें काढिलें व त्यायरोबर अभिनय केला कीं, टाळ्यावर टाळ्या पडतात, तें काय ह्मणून ? बस्स! नकोत त्यापेक्षां गंभीर कल्पना ! " देह दोन की एकचि समजनिया राहूं॥ " झालें, अशा साध्या व सरळ कल्पना बस्स आहेत. आतां ख-या स्थितीशीं जरी या जुळल्या नाहीत, तरी सुधारणेचें हें शतक, त्यांतलीं चांगलों भिगें दुर्विणीला छावून दोन देह एक दिसतील असं करूं ! त्या भिकारड्या कालिदासाची या ऐवजीं " एकमपि जीवितं द्विधा स्थित शरीरं " इतकी सयुक्तिक कल्पना नको, " वाचाळ मी नीट पाचरितों