मतः थोडें चमत्कारिक वाटलें; पण भाऊरावांनीं आपल्या मोहक गाण्यानें पुरुषपार्टाची चांगली छाप पाडून लवकरच पूर्वीच्या कामाचा लोकांस विसर पाडला. यांनीं आपल्या जोडीस डोंगरे यांच्या नाटकांत पूर्वी नायकाचें काम करीत असलेले रा. नारायणबुवा मिरजकर यांना घेतलें. त्यामुळे या दुकलीनें कंपनीचा पुन्हां जम बसत चालला. रा. नारायणबुवा हे मृच्छकटिकमध्यें जतीचें काम करीत असत व तें इतकें अप्रतिम करीत असत कीं, तसें काम कोणत्याही कंपनींत होत नसे. यांच्या कंपनींतील स्त्रीपार्टाची उणीव चांगल्या प्रकारें दूर झाली नाहीं ही गोट खरी, तथापि, रा. चिंतोपंत गुरव, मि. गोरे वगैरे मंडळींना तयार करून त्यांच्याकडून स्त्री पार्टीचीं कामें घेऊं लागले, व नाटकेंही नवीन बसविल्यामुळे लोकांस पूर्वीच्यांत व आतांच्यांत तुलना करण्याची संधी न मिळतां तीं बरीं वाटू लागली. याच संधीस त्यांनीं ' शापसंभ्रम ' नांवाचें एक नवें नाटक बसविलें. हें नाटक बाणभट्टकृत संस्कृत ' कादंबरीच्या ' आधारें रा. देवल यांनीं रचलें असून तें पुढ़ें येण्यास इंदूरचे महाराज श्री. शिवाजीराव होळकर यांचें बक्षिस कारणीभूत झालें आहे. मूळ कादंबरीतला विषय श्राव्य काव्यास जितका चांगला आहे तितका दृश्य काव्यास चांगला नाही; व त्यामुळे हें नाटक व्हावें तितकें सरस झालं नाहीं ही गोष्ट जरी खरी आहे, तरी त्यांतील
पान:मराठी रंगभुमी.djvu/156
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३८
मराठी रंगभूमि.