झालेला भुजंगनाथ यांचे स्वभाव चांगले उतरले असून नायिका जी शारदा तिचा स्वभावही चांगला साधला आहे. आपले वडील आपणास वृद्ध नव-याच्या गळ्यांत बांधतात हें ऐकून तिला झालेलें दुःख, आपल्यास जो नवरा पसंत नाहीं त्याशीं एकांतांत भेट घालण्याचा योग बापानें जुळवून आणला असतां तिनें मोकळ्या मनानें त्याजबद्दल व्यक्त केलेला तिटकरा, बाप तिच्यावर जुलूम करीत असतां व तो टाळण्याकरितां तिचा मामा तिला घरांतून निघून चल, मी तुला चांगला नवरा पाहून देतों असें सांगत असतां आईबापांना न कळत घर सोडून जाणें चांगलें नाही, काय होईल तें होवो ह्मणून घरांतच राहण्याचा तिचा निश्चय, व पुढे भुजंगनाथावर व इच्यावर लक्षाच्या अक्षता पडून तो विवाह सगोत्र आहे ह्मणून मोडल्यावर धड इकडे ना तिकड अशीच आपली स्थिति झालेली पाहून तिला झालेलें दुःख हे प्रसंग फार चांगले साधले आहेत. शारदेच्या सख्या जान्हवी व क्लरी यांनीं ह्याता-या नवऱ्याबद्दल : शारदेची केलेली थट्टा आणि विनोद हींही चांगलीं साधलीं आहेत. पद्यासंबंधानें पाहिलें तर ' पोरें टोरें लागति पाठीं हसतीं चिडवीतीं, ' ' तरि मोट बांधुनी माझी । विहिरींत नेऊन ढकला०, ' ' स्त्रीसह केव्हां निधन येधुनि, केव्हां पुनरपि बघिन गांव ' इ० कांहीं पद्ये सरस नाहींत. तथापि, अशांचा भरणा कमी असून
पान:मराठी रंगभुमी.djvu/161
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४३
भाग २ रा.