पान:मराठी रंगभुमी.djvu/170

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५२
मराठी रंगभूमि.


करीत असल्यामुळे त्या पात्राच्या भिस्तीवर नाटक पाहण्यास लेोकांची दाटी होत असे; व भाऊरावांचें काम चाललें असतां लोक चित्रासारखे स्तब्ध बसत असत. पण भाऊरावांच्या अकालीं मृत्यूमुळे * ही स्तब्धता एकदम


 * रा० भाऊराव कोल्हटकर हे ता. १३।२।१९०१ बुधवार रोजीं पुण्यास वारले. हे १८८२ च्या सप्टेंबर महिन्याच्या २० व्या तारखेस किलोंस्कर कंपनीत आले. त्या वेळेस त्यांचें वय सुमारें १९ वर्षाचें होतें. यांनीं प्रथम रंगभूमीवर प्रवेश केला त्या दिवशीं मंडळीस १५०० रुपयांची प्राप्ति झाली. इतकी प्राप्ति यापूर्वी कधीं झाली नाहीं व यापुढेंही होईल किंवा नाहीं याची वानवाच आहे. भाऊराव हे पूर्वी कंपनीकडून पगार घेत असून पुढें भागीनेंच होते. यांना पात्रांना शिकविण्याचा किंवा आपलें स्वतःचें काम करण्याचा कंटाळा नसे. एवढेच नव्हे तर, नाटकास कितीही कमी उत्पन्न होवो व मंडळी कितीही कमी येवो आपलें काम सतत कसोशीनें करीत असत. नाटकावर यांनीं चांगलेच पैसे मिळविले, व धर्मादाय आणि सार्वजनिक कामें यांसही त्यांनीं चांगली मदत केली. १८९९ सालीं मुंबईस गुजराथेंतील दुष्काळपीडित गुरांकरितां मंडळीच्यातर्फे भाऊरावांनी २५०० रुपये दिले. या वेळीं मुंबईकरांनीं यांस सरभालचंद्र याच्या हस्ते एक मानपत्र दिलें. विलायतेंत कांचेच्या कारखान्यांत शिकावयास गेलेले गृहस्थ मि० वागळे यांनीं मुद्म यांस तिकडे बोलाविलें होतें, व तुह्मी इकडे आल्यास मोठमोठ्या लॉड्रस वगैरे लोकांत तुमची ओळख करून देऊन तुमच्या गुणाची चीज करून देईन असें त्यांनीं आश्वासन दिलें होतें. परंतु त्यांची प्रकृति या वेळीं ठीक नसल्यामुळे ही विनंती त्यांना मान्य करतां आली नाहीं. भाऊराव यांची उत्तम गावयांत जरी गणना होणार नाही तरी आपल्या मधुर कंठरवानेंच त्यांनीं सगळ्या लोकांस वश करून घेतलें होतें.

(पृ. १५३ पहा)