पान:मराठी रंगभुमी.djvu/171

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५३
भाग २ रा.


नाहींशी झाली, व आण्णांच्या पाठीमागें किर्लोस्कर मंडळीवर संकटाचा हा दुसरा मोठा घाला येऊन पडला. तथापि, त्यांतूनही निभावून तिनें आपलें डोकें पुन्हां वर काढलें. येथून या कंपनीच्या इतिहासाच्या तिस-या भागास सुरवात झाली. ती हकीकत क्रमाक्रमानें पुढें येईल.

अलीकडील संगीत कंपन्या.

 या वेळीं संगीत नाटकाची लोकांस फार चटक लागून * माणिकप्रभुप्रासादिक, ' ' नाट्यकलाप्रवर्तक,' 'स्वदेश हितचिंतक, गोंवा संगीत मंडळी, ' ' वाशिमकर, ' 'आर्यसंगीतोत्तेजक, ' ' क्षत्रियभूषण संगीत मंडळी' वगैरे अनेक कंपन्या अस्तित्वांत आल्या. या कंपन्यापैकीं बहुतेक सर्व कंपन्या पाटणकरी नाटकांच्या धर्तीवर नाटकें करणा-या होत्या; व त्यांच्या पाशीं चालींच्या पद्यांवर व 'हा मदंगा ' सारख्या झगड्यांवर लोक लुब्ध झाल्यामुळे किर्लोस्करी नाटकें मागें पडलीं, व आतां तर किर्लोस्करी नाटकांतील स्वारस्य जाणणारा प्रेक्षकसमूह दुर्मिळ झाला आहे, व त्या नाटकांतील पद्यांच्या मोहक चालींची अभिरुचि उत्पन्न करणारीं पात्रे त्याहूनही दुर्मिळ झालीं आहेत. असो; वरील कंपन्यांपैकीं एक दोन कंपन्यांनीं


( १५२ पृष्ठावरुन समास. )

आपल्या आवाजीस कसून त्यांनीं तीस ताब्यांत ठेविलेंच होतें; पण त्यांत जें माधुर्य होतें ती पुष्कळांशीं ईश्वरदत देणगीचं ह्मटली पाहिजे. मरणसमयीं यांचें वय ३८ वर्षोंचें होतें.