जी नवी गोष्ट केली ती ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग ही होय. हीं ऐतिहासिक नाटकें हटलों ह्यणजे रा० पाठारे यांचं 'संगीत संभाजी, ' रा० बरवे यांचें ' महाराणा प्रतापसिंह, ' व कै० नारायण बापूजी कानिटकर यांच्या ' बाजीराव आणि मस्तानी ' या नाटकाचे आधारें रचलेलें ' संगीत प्रेमबंधन ' हीं होत. ऐतिहासिक नाटकांतील अनेक रसांचा संगीतानें विरस होतो अशी आमची समजूत आहे. त्यांतून त्यांतील व्यक्तींच्या मनांत एकापाठीमागून एक येणारे वीरश्रीचे विचार व विकार हे संगीतानें जितके व्यक्त व्हावयास पाहिजेत तितके व्यक्त होत नाहींत. अशा दृष्टीनें पाहिलें ह्मणजे या तिन्ही नाटकांचे प्रयोग चांगले वठत नाहींत असें ह्यणावें लागतें. आतां बोध करणें किंवा मनोवृत्ति विशेष रीतीनें उचंबळून सोडणें यापेक्षां गाण्यानें लोकांचें मनोरंजन करणें ही संगीत नाटकाचा मुख्य हेतु आहे. पण ज्या कंपन्यांनीं वरील तीन नाटकें केलीं त्यांतील पात्रं यथातथाच असल्यामुळे तोही हेतु चांगल्या रीतीनें साध्य झाला नाहीं. एवढेच नव्हे तर, ' वाशिमकर मंडळीं'तील जाधवरावाची शकारी तान ऐकून व आत्मारामाचा फाजिल लघळपणा पाहून सुजाण प्रेक्षकांना नाटकाचा कंटाळाच येई. ' संभाजी ' नाटकांत पूर्वीच्या चालीवरचीं पुष्काळ पद्य तरी आहेत; पण 'प्रेमबंधन' आणि 'प्रतापसिंह' यांत तसें नसून बन्याच ठिकाणीं पाटण-
पान:मराठी रंगभुमी.djvu/172
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५४
मराठी रंगभूमि.