संगीतांत झालीं नाहींत. तीं झालीं ह्यणजे लोकांच्या संगीताविषयींच्या अभिरुचीची कमाल झाली ह्मणावयाची ! असो; शेक्सपियरच्या नाटकांतील मूळचीं संविधानकें चांगलीं असल्यामुळे त्यानेंच लोकांचें थेोडेबहुत रंजन होतें; बाकी नाटकांचा परिणाम जितका त्यांच्या मनावर व्हावयास पाहिजे तितका या संगीत नाटकांनीं होत नाहीं हें निर्विवाद आहे. या कंपनींत रा. मराठे, केळकर वगैरे एक दोन पावें गाणारी बरी असून तीं अभिनयांतही कुशल आहेत. 'विकल्पविमोचनांतील' रा. मराठे यांचें पुतळीचें सोंग तर प्रेक्षणीय होतें. रा. बापट नांवाचे एक इसम या कंपनीत आहेत. यांना गाण्याचें अंग नाहीं, तथापि विनोदपर नकला व थट्टामस्करी करून ते लोकांचें बरेंच रंजन करितात. यांच्या मस्करीची केव्हां केव्हां कुस्करी होऊन विरस होतो; सबब रसभंग न होऊं देतां त्यांनीं आपलें हत्यार चालविल्यास ठीक होईल. ही मंडळी रामराज्यवियोग व हरिश्चंद्र हींही नाटकें करीत असून शेक्सपियरच्या नाटकापेक्षां तीं अधिक चांगलीं, व परिणामकारक होतात. या मंडळीवर पाटणकरी नाटकांतील चालींचा पूर्ण अंमल बसला आहे, तरी प्रयत्न केल्यास दिशा बदलण्यासारखी तिची स्थिति असून आजमितीस ज्या संगीत नाटकमंडळ्या अस्तित्वांत आहेत त्यांत हिचा नंबर बराच वर येईल असें आह्मांस वाटतें.
पान:मराठी रंगभुमी.djvu/175
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५७
भाग २ रा.