देतां रा. जोगळेकर नांवाच्या इसमास भाऊरावांचे जागीं आणून पुन्हां नाटकास सुरवात केली. जोगळेकर हें पात्र दिखाऊ आहे व गाण्यांत भाऊरावांची बरोबरी करणारें नाही, तरी इतर नाटककंपनींत आज मितीस जीं पात्रे आहेत त्यांत बरें आहे असें ह्मणण्यास हरकत नाहीं. यांची आवाजी बारीक असून चढतेही पुष्कळ. पण भाऊरावांसारखी नखरेबाज आणि खोंचदार गाण्याची ढब यांच्या आंगांत नसून भाषणाचा व गाण्याचा ताण पडला कीं पुष्कळ वेळां हे दमांत उकडून जातात ! तसेंच बारीक आवाजानें भाषणांत रंग येत नसून स्टेजवर येण्याबरोबर जो कांहीं विशेष प्रकारचा धीटपणा लागतो त्याची यांचेठायीं कमतरता असल्यामुळे त्यांचें गाणें व आभिनय हीं भिडस्तपणाचीं दिसतात. हे कपर्नींत आल्यावर तिनें नवें नाटक बसविलें तें ‘ मूकनायक ' हें होय. हें नाटक रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनींच रचलें असून त्याचें संविधानक येणेप्रमाणें आहे:- शरचंद्र नांवाच्या राजाची सरोजिनी नांवाची एक बहीण होती. ही उपवर झाली असून तिजवर विक्रांत नांवाच्या दुस-या एका सार्वभौम राजाची प्रीति बसली होती. विक्रांत हा रोहिणी नांवाची शरचंद्राची जी बायको होती तिचा आतेभाऊ. शरच्चंद्रास मद्यपानाचें व्यसन जडलें होतें. एकदां तो व्यसनासक्त झाला असतां त्याजवर मारेक-यांनीं हल्ला केला त्यावेळीं विक्रांतानें त्यास सोडविलें. पुढें विक्रांत
पान:मराठी रंगभुमी.djvu/179
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६१
भाग २ रा.