पान:मराठी रंगभुमी.djvu/187

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६९
भाग २ रा.

जे दोष काढले आहेत तेही विचार करण्यासारखे असल्यामुळे त्यांतील महत्वाचा भाग येथें देतों:-'यांतील संविधानक उदात्त प्रकारचें नसून नाटकांतील प्रसंगही चांगले साधले नाहींत. या नाटकांतील मुख्य उद्देश दुष्टबुद्धीचा दुष्ट स्वभाव व्यक्त करणें हा आहे, पण तो चांगल्या रीतीनें साध्य झाला नाहीं. हा साध्य होण्यास दुष्ट्बुद्धीची स्त्री मेधावती हिची चंद्रहासाबद्द्द्ल जास्त सदयता व्यक्त झाली पाहिजे. मेधावती आरंभीं एकदां जी चंद्रहासाबद्द्द्ल कळकळ दाखवून आंत जाते ती फिरून स्टेजवर येत नाहीं. मेधावतीस पुष्कळ वेळां बाहेर आणून चंद्रहासाबद्द्द्ल कळकळ दाखविली असती, तर दुष्ट्बुद्धीचा दुष्टपणा जास्त खुलून दिसला असता. तसेंच दुष्टबुद्धीच्या मुद्रेवर आपल्या कृतीचे विकार दिसले पाहिजेत व हे अथेल्लोंतील यागोप्रमाणें भाषणांत जितके दिसतील तितके संगीतांत दिसणें अशक्य आहे. लहान चंद्रहास पुढें बारा वर्षांनीं मोठा करून स्टेजवर आणणें, कालदृष्टीच्या विचारानें विसंगत आहे. विषयेचीं व चंद्रहासाचीं प्रेमाचीं भाषणें अधिक खुबीदार व्हावयास पाहिजेत, पण तीं झालीं नाहींत. तिस-या अंकांत विषयेला रंगभूमीवर आणलें आहे, पण तिला इतक्या उशीरानें न आणतां दुस-या अंकांत आणलें असतें, तर पहिले दोन अंक इतके कंटाळवाणे झाले नसते. नाटक मोठें व पांच अंकांचें केलें पाहिजे अशा समजानें ग्रंथकतर्त्यांकडून ही चूक झाली असावी. ब्राह्मणांच्या मंत्राक्षता संगीत कशाला ? संगीतानें त्यांतील गांभीर्य नाहीसें करून टाकलें. नांदीचीं पदयें चांगलीं नसून प्रथमारंभीं जी प्रयोगाची छाप पडावयास पाहिजे ती त्यांनीं पडत नाही. मांग चंद्रहासास मारावयास जातात त्यावेळीं चंद्रहासाबद्द्द्ल लोकांची कळकळ व मांगांबद्द्द्ल तिट्ट्करा उत्पन्न व्हावयास पाहिजे तो मांगांच्या फाजील भाषणाने व अभिनयानें होत नाहीं. तसेंच नृसिंहृदर्शनानें मांगांस भीति उत्पन्न झाली असें दिसलें पाहिजे त्याऐवजी त्यांचा धट्टपणा व फाजिलपणा दिसून