पान:मराठी रंगभुमी.djvu/188

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७०
मराठी रंगभूमि.


 ही मंडळी अलीकडे शाकुंतल व सौभद्र या नाटकांचे प्रयोग करू लागली आहे. पण कोणत्याही दृष्टीनें ते पूर्वीच्या प्रयोगांच्या शतांशही उतरत नाहीत. याचें कारण नव्या धावपळाच्या चालावरचा पद्य ह्मणण्याचा संवय झालेल्या पात्रांना यांतील पद्यें ह्मणतां येत नाहींत, व रागबद्ध संगीताचेंही त्यांना विशेष अंग नाहीं, त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखे वाटून तीं भांबावून जातात. या नाटकांत रा. जोगळेकर हे अनुक्रमें दुष्यंत व अर्जुन ह्यांचीं कामें करीत असून रा. गोरे हे शकुंतला व सुभद्रा यांच्या भूमिका घेतात. या दोघांचींही कामें व्हावीं तशीं होत नाहींत. रा जोगळेकर तर या नाटकांत दर तासास ४० याप्रमाणें आपल्या पद्यांचा वेग ठेवितात व त्यामुळे


येतो. ' अपराध घडूं नये घडला ' अशा प्रकारच्या इतर नाटकांतील पद्यांची या नाटकांतील पद्यांवरुन आठवण होते. लढान चंद्रहास व विषया यांचींच कांहीं पद्यें स्टेजवर उठून दिसतात. पण दुष्ट्बुद्धी व मोठा चंद्रहास यांनीं घाण केली. दुष्टबुद्धीचा तर त्या दिवशीं आवाजच लागला नाहीं त्यामुळे इतर नाटकांत हें पात्र मुख्य भूमिका कशी करतें याचा मोठा संशय उत्पन्न झाला. मोठ्या चंद्रहासानें ' अचिलत्य ' ' कल्या ' ' धलूया ' ' निरलुज ' (अचिंत्य, कन्या, धन्या, निरंजन) इ. शब्द गवयाच्या ऐटीवर ह्मणून पद्यें ह्मटलीं एवढेंच, बाकी त्याचीं पद्यें मुळीच चांगलीं झालीं नाहींत. नाहीं ह्मणावयास ' बलधु (बंधु) मज आज ' हें पद्य कांहीं अंशीं नव्या चालीनें व कांहीं अंशीं सुरेलपणानें बरें झालें. दुष्टबुद्धी मदनास वळवितो हा प्रसंग बरा साधला आहे; पण असले प्रसंग या नाटकांत फार थोडे आहेत.”