पान:मराठी रंगभुमी.djvu/20

हे पान प्रमाणित केलेले आहे.
मराठी रंगभूमि.



कालीं तमाशाकडे लोकांची फार प्रवृत्ती असल्यामुळे साळु नायकीण, गणपतीबुवा लंबोदर वगैरे कित्येक इसमांनीं तमाशावर हजारों रुपये कमाविले असे म्हणतात.
 लळितं व तमाशे यांखेरीज गोंधळाचाही थोडाबहुत संबंध मराठी रंगभूमीशीं पोहोंचतो. गोंधळांत कांहीं कांहीं गोंधळी नकला करणारे फार उत्तम होते. आतां लळितांत किंवा तमाशांत निरनिराळीं सोंगें आणून जशा


(पृष्ठ ५ वरून चालू.)

लागले. पुढें कांहीं दिवसांनीं शाहीर यांच्या लक्षांत ती गोष्ट येऊन त्यांनीं लावणींत आपलें नांव घालण्याचें जोशीबोवांकडून मना करविलें. शाहीर यांनीं जोशीबोवांस सांगितलें कीं, "खरोखर मला कविता करण्याचें ज्ञान नसून मोठेपणा देता हे बरोबर नाहीं," असें सांगून तो प्रघात बंद करविला. यावरून शाहीर ह्रा मनुष्य सत्यास मान देणारा होता असें दिसतें. पुढ़ें जोशीबोवा आपल्या कुलस्वामी व्यंकटेशाचे नावलावणीत घालू लागले. तेव्हां कोणी सांगितलें कीं, "असें करतां त्यापेक्षां तुझी आपलेंच नांव लावणीत कां घालीत नाहीं. देवाचें नांव लावणींत घालण्यांत काय मोठेपणा आहे !!" हें ऐकून जोशीवुवा पुढें आपलें नांव ' राम ' असें लावणीत घालूं लागले. परंतु त्या कारणानें तर फारच घोंटाळा होऊं लागला. ह्मणजे त्याच वेळीं कोणी रामा रंगारी ह्मणून होता तोही लावण्या करून आपलें नांव ' राम ’ असें लावणीत घालीत असे. तेव्हां रामजोशी यांची लावणी कोणती आणि रामा रंगाऱ्याची कोणती हे साधारण मनुष्यास ओळखण्याची मोठी अडचण पडूं लागली.हे वर्तमान जोशीबोवांच्या कानावर आलें तेव्हापासून मग ते ' कविराय ' असें आपलें नांव लावणीतून घालू लागले. पुढ़ें मग हाच प्रघात शेवटपर्यंत कायम होता. ”