पान:मराठी रंगभुमी.djvu/204

हे पान प्रमाणित केलेले आहे.
भाग ३ रा.


पौराणिक नाटकें कोणत्या धर्तीवर करावीं ?--बुकिश नाटकांविषयी हलगर्जीपणा--ऐतिहासिक नाटकांत सुधारणा '; उत्तेजन-नाट्यकलेची आस्ते आस्ते उधारणा झाली पाहिजे--बुकिश व संगीत नाटकें परिणामकारक होण्याचे सामान्य नियम--संगीत नाटकांसंबंधानें विशेष सूचना---चालकांची अंतर्बाह्य व्यवस्था--नाटकांत स्त्रिया असण्यापासून फायदे व तोटेदृष्ठाच्या संगीत नाटकांचें पर्यवसान-लोकाभिरुचि कोणी बिघडविली ?--नाट्यकला सुधारण्यास कोणी कसें साहाय केलें पाहिजे ? --जाहिराती व ह्रस्तपत्रकांत सुधारणा-नाटकगृहें कशीं असावं ? --नाट्यकलेसंबंधानें विद्वानांचे विचार.

पौराणिक नाटकें कोणत्या धर्तीवर करावीं ?

बुकिश नाटकें रंगभूमीवर होऊं लागल्यापासून पौराणिक नाटकें मागें पडलीं, व आतां क्कचित प्रसंगींच तीं पाहण्यास मिळतात. पौराणिक नाटकें नावडतीं होण्यास मुख्य कारण त्यांतील धांगडधिंगा होय. हा धांगडधिंगा कमी करून बुकिश नाटकांच्या धर्तीवर जर त्यांची रचना केली तर तीं लोकप्रिय होतील. आमच्या मतें भारत,भागवत व रामायण या ग्रंथांतून जे कथाभाग वर्णिले आहेत त्यांच्या इतके सरस कथाभाग दुसरीके मिळणे मुश्कील आहे. कपट, राज्याकारस्थान, शौर्य, नीति इ. गोष्टींचा प्रेक्षकांच्या मनावर उत्तम ठसा उमटविण्या इतके वरील ग्रंथांत जितके प्रसंग आहेत तितके दुसरी-