उदाहरणें अनेक देतां येतील, पण स्थलसंकोच्यास्तव नाटकप्रयेागांत नेहमीं येणा-या एका गोष्टीचें उदाहरण येथें देतों:- एक इसम दुसन्या इसमास पत्र पाठवितो
त्यावेळीं वरचा लखोटा वगैरे मोठ्या ऐटींत केलेला
ऐटत तो फाेडतो; पण आंत खरें पत्र न निघतां एखादें छापिल हस्तपत्रक जेव्हां दिव्याच्या उजेडांत दिसतें तेव्हां प्रेक्षकांची तादात्म्य झालेली वृति नाहींशी होऊन त्यांचा
विरस होती ! खऱ्या सामानानें प्रेक्षकांनाच तेवढी हुरूप येते असें नाहीं, तर खुद नटासही चांगली हुरूप
चैते. पूर्वीपासून सुमरसिंगाचें काम करणाच्या एका इस
दार असल्यामुळे भाषांतररूपानें येथें देतों:-मिचेल एंजेलो ह्मणून एक प्रख्यात कारागीर होऊन गेला. ताे खोदांव काम फार सुबक करीत असे. कांहीं दिवस तो एक दगडाचा पुतळा घडवीत असतां एके दिवशीं त्यांच्या मित्रानें त्याला भेटावयास बोलाविलें आणि सांगितलें कीं,' मागे जसा मी तुझा पुतळा पाहिला होता तसाच तो आज पाहिला. त्यांत कमजास्त म्हणुन कांहींच दिसलें नाहीं!' त्यावर तो कारागीर म्हणाला, ' बाबारे, थोडासा थांब, म्हणजे मी तुझी अशी खात्री करीन कीं, मागच्यांत आणि आतांच्यांत पुष्कळ अंतर आहे. आतां मी भिवया कोरून डोळ्याच्या कांहीं पार्पण्या काढिल्या आहेत व तोंडाची दुसरी एक नवी रेखा खोदली आहे. त्याचा मित्र म्हणला' होय , हें सर्व मी पाहिलें आहे, पण ह्या अगदीं लहानसान गोष्ट्रीनीच पुर्णता होत असते; मग पूर्णतेला नूं यःकश्चित् मानतोस की काय ?