मागील कामाचा परिणाम एकदम त्यांच्या मनावरून उडून जातो. घटकेंत राजा घटकेंत चाकर, घटकेंत दासी अशा भूमिका घेणा-या पात्राचें वजन कसें बरें पडेल? त्यांतून कित्येक भूमिका अशा आहेत कीं, त्या ताबडतोब एकाच पात्रानें बदलून केल्या कीं, त्याबद्दल प्रेक्षकांना तिटकाराच येतो. आम्हांस एकदां असा अनुभव आला आहे कीं, एका नाटकांत आरंभीं एका इसमानें नायकिणीची भूमिका घेऊन नृत्यगायनासह हावभाव केले व लगेच तें सोंग बदलून पुढच्या प्रवेशांत हें नायकिणीचें पात्र देवी होऊन पुढे आलें, व तेंही स्वस्थ न बसतां भाषण करूं लागलें. त्यायोगानें असें झालें कीं. आरंभीं त्या पात्रानें नायकिणीचें काम केल्यामुळे देवीच्य दर्शनानें व भाषणोंनें जो एक प्रकारचा पूज्यभावात्मक आणि भव्य परिणाम व्हावयाचा तो झाला नाहीं. तात्पर्य काय कीं, एकाच इसमानें निरनिराळीं कामें न कारतां होतां होईल तों प्रत्येक कामाकडे स्वतंत्र इसम असणें चांगलें. नेहमीं तमाशे वैगरे चाललल्या रंगभूमीवर चांगलीं नाटकें करितांनासुद्धां वरच्याप्रमाणेच प्रेक्षकांच्या मनावर सुपरिणाम होण्यास फार वेळ लागतो, यावरून नाटकप्रयोगाकरितां स्थलाची योजनाही कशी करावयास पाहिजे हें कळून येईल.
(७) नाटकाचा विरस होण्यास पुष्कळ वेळां पात्रांचें खासगी संभाषण जें रंगभूमीवर चाललें असतें तें
पान:मराठी रंगभुमी.djvu/225
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९१
भाग ३ रा.